Preity Zinta Instagram @realpz
मनोरंजन बातम्या

Preity Zinta Family: अवघ्या लहान वयातच कोसळला प्रीती झिंटावर दुःखाचा डोंगर, हे सर्व सावरत झाली यशस्वी अभिनेत्री

प्रीती झिंटा १३ वर्षाची असताना तिच्या आई-वडिलांचा अपघात झाला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Preity Zinta Lost Her Father At Very Young Age: अभिनेत्री प्रीती झिंटाचा आज ४८वा वाढदिवस आहे. प्रीतीचा जन्म ३१ जानेवारी, १९७५ साली झाला. हिमाचल प्रदेशमधील शिमला येथे एका हिंदू राजपूत कुटुंबाबात प्रीतीचा जन्मली आहे. प्रीतीच्या वडिलांचे नाव दुर्गानंद झिंटा आणि आईचे नाव नीलप्रभा झिंटा आहे. प्रीतीचे वडील भारतीय लष्करात अधिकारी होते. प्रीती १३ वर्षाची असताना एका कार दुर्घटनेत तिच्या वडिलांचा मृत्यू झाला.

प्रीती १३ वर्षाची असताना झालेल्या दुर्घटनेत प्रीतीची आई देखील गंभीर जखमी झाली होती. प्रीतीला दीपंकर आणि मनीष असे दोन भाऊ आहेत. दीपंकर झिंटा भारतीय सैन्यात कमिशन अधिकारी आहे. तर मनीष कॅलिफोर्नियात राहतो.

प्रीती झिंटा एक अभिनेत्री तर आहेच त्याचबरोबर ती बिझनेस वूमन, सोशल वर्कर, टेलिव्हिजन प्रेसेंटर देखील आहे. प्रीती PZNZ मीडिया या निर्मिती संस्थेची संस्थापक आहे. २००८ पासून प्रीती इंडियन प्रीमियम लीगमधील किंग्स इलेव्हन पंजाबची को-ओनर आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेतील टी-२० ग्लोबल लीग क्रिकेट स्टॅलनबॉश किंग्सची मालकीण आहे.

प्रीती झिंटाने १९९८ साली बॉलिवूड चित्रपट 'दिल से'च्या माध्यमातून अभिनय कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर ती 'सोल्जर'मध्ये दिसली होती. 'उन्हे क्या कहना', 'चोरी चोरी चुपके चुपके', 'दिल चाहता है', 'दिल है तुम्हारा', 'अरमान', 'कोई मिल गया', 'वीर जारा', 'सलाम नमस्ते', 'कभी अलविदा ना कहना' या चित्रपटांमध्ये प्रीतीने काम केले आहे.

प्रीती झिंटाने २९ फेब्रुवारी, २००९ साली लॉस अॅजिल्स येथे अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थित जीन गुडएनफशी लग्न केले. गुडएनफ अमेरिकेतील हॅड्रोइलेकट्रीक पॉवर कंपनी एनलाईन एनर्जीमध्ये वित्त विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. लग्नानंतर प्रीती अमेरिकेत शिफ्ट झाली आहे. नोव्हेंबर २०२१मध्ये प्रीती सेरोगेसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे. तिच्या मुलाचे नाव जय आणि मुलीचे नाव जीया आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card KYC: मोठी बातमी! महाराष्ट्रातील तब्बल १,५०,००० रेशन कॉर्ड बंद, मिळणार नाही धान्य; तुमचंही नाव आहे का?

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

GST Reforms: खुशखबर! कार आणि बाईकच्या किंमती कमी होणार? जाणून घ्या केंद्र सरकारची मोठी योजना

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT