Palak Tiwari And Ibrahim Ali Khan Dating Rumors Instagram
मनोरंजन बातम्या

Palak Tiwari And Ibrahim Ali Khan Viral Video: सैफचा पोरगा इब्राहिम खान करतोय श्वेता तिवारीच्या लेकीला डेट, व्हिडिओ पाहून नेटकरी बुचकळ्यात

Palak Tiwari And Ibrahim Ali Khan News: मुंबईतील जुहू येथील पीव्हीआरच्या बाहेर इब्राहिम आणि पलक हे दोघेही स्पॉट झाले.

Chetan Bodke

Palak Tiwari And Ibrahim Ali Khan Dating Rumors: श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने नुकतेच सलमान खानसोबत सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. पलक शनिवारी रात्री विकेंड एन्जॉय करण्यासाठी ती बाहेर पडली होती. पण रात्री पलकसोबत सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान देखील दिसला. मुंबईतील जुहू येथील पीव्हीआरच्या बाहेर दोघेही स्पॉट झाले. यावेळी दोघांच्या लूकनेही प्रेक्षकांचे मन वेधले.

यावेळी क्यूट कपलने विकेंडच्या दिवशी, थिएटरमध्ये एकत्र जाताना दिसले. यावेळी पलकने ब्लॅक क्रॉप टॉप, जॅकेट आणि मॅचिंग जीन्स घातली होती. तर इब्राहिमने पांढरा टी-शर्ट, काळा शर्ट आणि जीन्ससोबत त्याने कॅरी केला होता. सध्या सोशल मिडियावर या दोघांचेही व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

पलकने अनेकदा इब्राहिमला डेट करत असल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. दोघेही एकाच ठिकाणी आणि एकाच वेळी स्पॉट झाल्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या अफवांना कमालीची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे जुहू पीव्हीआरमधून बाहेर पडताना पलकने इब्राहिमचे जॅकेट हातात धरले होते. मात्र, पलक थिएटरच्या मागच्या बाजुने बाहेर पडताना दिसली.

काही दिवसांपुर्वीही सारा अली खान आणि इब्राहिमसोबत पलक गोव्यात सुट्टीचा आनंद घेतांना दिसली होती. अनेक दिवसांपासून इब्राहिम आणि पलकच्या लवस्टोरीची चर्चा झाली आहे. त्यावरुन वेगवेगळ्या अफवाही पसरवल्या जात आहेत. इब्राहिम आणि पलक हे दोघेही अभिनेता करण मेहताच्या बर्थ डे पार्टीमध्येही एकत्र दिसले होते. त्या पार्टीतही सगळ्यांच्या नजरा या पलक तिवारी आणि इब्राहिमवर होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या तरुणाला अटक

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT