saam tv
मनोरंजन बातम्या

Nora Fatehi Accident: मोठी बातमी! बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात

Nora Fatehi Accident: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा मुंबईत कार अपघात झाला आहे. ती एका संगीत महोत्सवात सहभागी होण्यासाठी जात होती, त्यावेळी दुर्घटना घडली.

Bharat Jadhav

संजय गडदे, साम प्रतिनिधी

बॉलिवूड अभिनेत्री व प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही हिचा कॉन्सर्टसाठी जात असताना रस्ते अपघात झाला. दारूच्या नशेत असलेल्या एका वाहनचालकाने तिच्या कारला जोरदार धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात नोरा फतेहीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाहीये.

अपघातानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली असून संबंधित चालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. नोरा फतेही सुरक्षित असून तिच्या टीमकडून चाहत्यांना दिलासा देणारी माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे मद्यधुंद वाहन चालकांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

एका सूत्राने सांगितले की, "नोरा फतेही सनबर्न फेस्टिव्हलमध्ये डेव्हिड गुएटासोबत तिच्या नियोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होती. त्यावेळी तिच्या कार चालकानं एका दुसऱ्या वाहनाला धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्रीचा कार चालक कार चालवताना दारू प्यायला होता. अपघात होताच अभिनेत्रीच्या टीमने तिला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले.

डॉक्टरांनी रक्तस्त्राव आणि अंतर्गत दुखापती तपासण्यासाठी ताबडतोब सीटी स्कॅन केल्याची माहिती मिळालीय. दरम्यान तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की नोराला किरकोळ दुखापत झालीय. तर दुसरीकडे पोलिसांनी गुन्हा दाखल करत चालकाला ताब्यात घेतले आहे. डॉक्टरांनी नोरा फतेहीला आराम करण्याचा सल्ला दिलाय. पण कार्यक्रम नियोजित असल्याने तिने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतलाय. नोरा ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय चेहरा आहे. ती तिच्या नृत्य कौशल्यासाठी ओळखली जाते आणि तिने चित्रपटांमध्येही काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Handi Horoscope : आज या राशींना मिळू शकतो आर्थिक लाभ! दहीहंडी आणि शिक्षक दिनाचा योग; पंचांगात काय आहे खास? वाचा

Bad Cholesterol : बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यावर रात्री पायांमध्ये दिसतात 'ही' ५ लक्षणे, दुर्लक्ष करणे पडेल महागात

IND vs PAK women: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! आजच्या सामन्यात कोण मारणार बाजी; कुठे पाहता येणार सामना?

Maharashtra News Live Update: पुणे- डीजे,स्पीकर विरोधात परत एकदा पुणेकर रस्त्यावर उतरणार

Pune Police: बनावट प्रमाणपत्रे दाखवत १९ उमेदवार झाले पोलिस, दोघांना बेड्या; पुणे पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT