Nora Fatehi money laundering case Instagram @norafatehi
मनोरंजन बातम्या

Nora Fatehi: सुकेश चंद्रशेखरवरून जॅकलिन - नोरा भिडल्या; बॉलिवूडच्या 'आयटम गर्ल'चं एक पाऊल पुढे...

बॉलिवूडची आयटम गर्ल नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस या दोघी मनी लॉंड्रिंग प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

Chetan Bodke

Nora Fatehi: सुकेश चंद्रशेखर प्रकरणात दिवसेंदिवस नवनवे ट्विस्ट समोर येत आहेत. बॉलिवूडची आयटम गर्ल नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस या दोघी मनी लॉंड्रिंग प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. नोराने दिल्ली कोर्टात जॅकलिन आणि काही मीडिया कंपन्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप नोरानं केला आहे. तसं तिनं कोर्टात म्हटलं आहे.

सुकेशसोबत तिचा कोणताही संपर्क नव्हता. सुकेशची पत्नी लीना मारिया पॉल हिच्या माध्यमातून तिची आणि सुकेशची ओळख झाली होती. नोराने सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेण्यास नकार दिला होता. तिला या प्रकरणात माध्यमांवर आणि सोशल मीडियावर करण्यात आलेल्या ट्रोलिंगमुळे खुपच दु:ख झाले होते. जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीची मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने बऱ्याचदा एकत्र चौकशी केली आहे.

सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचाही आरोप नोरावर करण्यात आला होता. मात्र, नोराने प्रत्येक वेळी चौकशीदरम्यान हा आरोप चुकीचा असल्याचे सांगितले होते. सुकेशने नोरा फतेहीच्या बहिणीचा पती बॉबी याला ६५ लाखांची बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केल्याचे सांगितले होते.

सुकेशने नोराला बीएमडब्ल्यू कारची ऑफर दिली होती, पण नोराने ही ऑफर नाकारली. नोराला सुरुवातीपासूनच या डीलबद्दल संशय होता. सुकेश सतत नोराला फोन करायचा पण तिने त्याला ब्लॉक केले, असे सांगितले जाते. सुकेशची पत्नी लीना आणि तिची एका कार्यक्रमात भेट झाली होती, असं नोराने ईडीला सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diya Cleaning Tips : दिवाळीपूर्वी जुन्या पणत्या अन् समई करा नव्यासारखी लख्ख, 'ही' घरगुती ट्रिक २ मिनिटांत करेल काम

Maharashtra News Live Update: जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून खा. उदयनराजे भोसले यांचा अर्ज मागे

Hand Exercises : हाताच्या बोटांमध्ये वारंवार सुन्नपणा जाणवतोय? 'हे' ६ व्यायाम वेळीच करा,नाहीतर....

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात गुजरातमधून आणखी एकाला अटक, नेमकं कनेक्शन काय?

Diabetes : तुमच्या किचनमधील 'हे' ५ पदार्थ देतात रक्तातील साखरेला बुस्ट, आजच खाणे करा बंद

SCROLL FOR NEXT