Yami Gautam Saam Tv
मनोरंजन बातम्या

बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; म्हणाली, इच्छेविरुद्ध मी...

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिनं आपल्या कारकिर्दीत खूप कमी हिट चित्रपट दिले असले तरी, आपल्या अभिनयातून तिनं आपली छाप पाडली आहे.

साम वृत्तसंथा

मुंबई: बॉलिवूड (Bollywood)अभिनेत्री यामी गौतम हिनं आपल्या कारकिर्दीत खूप कमी हिट चित्रपट दिले असले तरी, आपल्या अभिनयातून तिनं आपली छाप पाडली आहे. आता यामी गौतम (Yami Gautam) हिने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा केला आहे. अनेक चित्रपट असे आहेत की ते इच्छा नसतानाही केले आहेत, असा दावा तिने केला आहे. टीमने सांगितले म्हणून ते चित्रपट केले. त्यात एका स्टार अभिनेत्यासोबत काम करण्याचा सल्लाही देण्यात आला होता. तसेच ऋतिक रोशनसोबत 'काबिल' चित्रपट केला होता. तोही माझ्या इच्छेविरोधात केला, असंही तिनं सांगितलं.

काबिल एक रोमँटिक आणि थ्रिलर चित्रपट होता. २०१७ मध्ये तो प्रदर्शित झाला होता. संजय गुप्ता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. ऋतिक रोशननं या चित्रपटात एका ब्लाइंड व्हाइसओव्हर आर्टिस्टची भूमिका साकारली होती. तर यामी गौतमनं या चित्रपटात ऋतिकच्या पत्नीची भूमिका केली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट ठरला होता. मात्र, यामी गौतमचं म्हणणं वेगळंच आहे. या चित्रपटातील तिची भूमिका फार लक्षवेधी ठरली नाही. या चित्रपटातून फारशी दखल घेतली नाही, असं तिचं म्हणणं आहे.

या मुलाखतीत तिने अनेक खुलासे केले. आयुष्यातील एक काळ असा असतो की, तुम्ही ट्रेंड फॉलो करत असता. मला त्याचा अनुभव आलाय. अनेक चित्रपट मी इच्छेविरोधात केले आहेत. कारण ते करण्यासाठी कुणीतरी सांगितले होते. तुम्हाला चित्रपटाची कॉन्सेप्ट लक्षात येत नाही. तरीही तुम्ही तो चित्रपट करता. असे चित्रपट न करता मी कुंगफू शिकायला हवं होतं, असं मला वाटतं. अशा चित्रपटांत काम करण्यापेक्षा मला अन्य काही शिकायला हवं होतं, असं यामी गौतमनं सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT