मनोरंजन बातम्या

Neha Sharma Fitness: 36 वर्षांच्या नेहा शर्माच्या फिटनेस अन् सौंदर्याचं गुपित काय?

Neha Sharma Fitness Secret: बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा नेहमीच सेशल मीडियावर चर्चेत असते. नेहाने तिच्या निरोगी आरोग्याचे सिक्रेट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या फिटनेस आणि लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या सौदर्याची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर सुरु असते. नेहा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमी सर्किय दिसते. नेहा तिच्या ट्रिप्स आणि शुटिंग्सचे पोटो तिच्या सेशल मीडियावर पोस्ट करत असते. नेह शर्माने चिरुथा या तेलगू चित्रपटामधून अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर तिला बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम मिळण्यास सुरुवात झाली. नेहाने 'क्रुक' या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीमध्ये तिचं पहिलं पाऊल टाकलं.

नेहाने यमला पगला दीवाना 2, सोलो आणि तान्हाजी या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनामध्ये अपलं स्थान निर्माण केलं आहे. सध्या नेहा ३६ वर्षांची असून सर्वत्र तिच्या फिटनेसची चर्चा सुरु असते. तिच्या बोल्ड अंदाजामुळे आणि अदाकारीमुळे अनेक चाहते घायाळ होताना दिसतात. नेहा वेस्टर्नसह ट्रेडिश्नल लूकमध्ये देखील खुप छान दिसते.

एका मुलाखाती दरम्यान नेहानी तिच्या फिटनेसचं सिक्रेट चाहत्यांशी शेअर केलं आहे. नेहानी सांगितले की, नेहा तिच्या फिटनेसला ती नेहमी सकाळी उठल्यावर नियमित योगा करते आणि व्यायाम करते. त्यासोबतच सकाळी ४५ मिनिटे वॉकला जाते. यामुळे तिचं वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते असं तिनं सांगितले. नेहा दररोज सकाळी उठल्यावर पावर योगा करते ज्यामुळे तिचं आरोग्य निगोगी राहाण्यास मदत होते. नेहाला डांसची आवड आहे त्यामुळे आठवड्यातून तिनवेळा ती जुंबा, हिप पॉप आणि साल्सा या डांसच्या क्लासेसला जाते. त्यासोबतच नेहाला जुंबा डान्स करण्यास भरपूर आवडतं.

त्यानंतर नेहाने सांगितले, व्यायामासोबत पोषक आणि योग्य आहारचं सेवन करणं गरजेचं असतं. नेहा तिच्या आहारामध्ये ओमेगा ३ गुणधर्म असलेल्या पदार्थांचा समावेश करते. नेहाला मासे आणि सिफूड खाण्याची आवड आहे. नेहा तिच्या आहारामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट्स योग्य प्रमाणात खाते. पोषक आहारामुळे नेहाची त्वचा आणि आरोग्य सदैव निरोगी राहातं. नेहा तिच्या दिवसाची सुरुवात ब्लॅक कोफीने करते. ब्लॅक कॉफीच्या सेवनामुळे तुमचं वजन नियंत्रित राहातं. नेहा अनेकदा इंटिमेटींग फास्टिंग करते त्यामुळे तिच्या शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. नेहा तिचा लंच सकाळी ११ किंवा दुपारी १२ वाजेपर्यंत करते. नेहा तिच्या लंचमध्ये अंडी, अवकाडो आणि ऑरेज ज्यूसचे सेवन करते.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT