Mouni Roy Discharge From Hospital Instagram/@imouniroy
मनोरंजन बातम्या

Mouni Roy Discharge From Hospital: मौनी रॉयला कसली चिंता? अभिनेत्रीला जडला ‘हा’ आजार; नुकताच मिळाला डिस्चार्ज

Mouni Roy Latest Health Update: नेहमीच अभिनयासाठी आणि आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणारी मौनी यावेळी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mouni Roy Was In Hospital For 9 Days: अभिनेत्री मौनी रॉय हिनं टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर टाकली. टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यंत मौनीने अभिनयच्या आणि मेहनतीच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख तयार केलीय. नेहमीच अभिनयासाठी आणि आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणारी मौनी यावेळी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.

मौनी रॉयने तिच्या चाहत्यांसोबत एक महत्वाची माहिती शेअर केली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत एक धक्कादायक माहिती शेअर केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये मौनी रॉय म्हणते, “मी ९ दिवस हॉस्पिटलमध्ये वेळ घालवल्यानंतर, मला हॉस्पिटलमध्ये कधीही न अनुभवलेली शांतता मिळाली. मी आता रूग्णालयातून घरी आली असून मी आता आजारपणातून बरी देखील होत आहे, आणि बरंही वाटत आहे.”

अभिनेत्री आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणते, “माझ्या प्रियजणांचे आणि मित्रमंडळींचे खूप खूप आभार, ज्यांनी माझ्या आरोग्याची काळजी घेतली, मला शुभेच्छा आणि प्रेम दिलं.” यावेळी तिने पती सूरज नांबियारसाठी देखील पोस्टमध्ये लिहिलं आहे, अभिनेत्री म्हणते, “तुझ्यासारखा कोणी नाही.. मी कायमची ऋणी आहे.” अभिनेत्रीने सध्या तिच्या कामातून ब्रेक घेतला असून तब्बल ९ दिवस रूग्णालयात उपचार घेत होती. सोबतच अभिनेत्री दुबईमध्ये पती सूरज नांबियारसोबत वेळ घालवत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर रूग्णालयातील देखील फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्रीने काही तासांपूर्वीच आणखी एक पोस्ट शेअर केली होती, त्यामध्ये तिने काही फसव्या गोष्टींवर भाष्य करत चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले. सध्या सोशल मीडियावर मौनी नेमकी कोणत्या कारणामुळे आजारी पडली याची चर्चा सुरू आहे. अतिविचारामुळे आणि ताणतणावामुळे अभिनेत्रीची तब्येत खालावल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होतेय. मौनीची ही पोस्ट पाहून तिचे चाहते तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. सोबतच तिच्या तब्येतीचीही चाहते काळजी करत असून तिला काळजी घेण्याचंही आवाहन करत आहे.

मौनीच्या कामाबद्दल बोलायचे तर, गेल्या वर्षी अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’मध्ये अभिनेत्री मुख्य भूमिकेत होती. लवकरच मौनी ‘फ्लिक द वर्जिन ट्री’ मध्ये झळकणार असून तिच्यासोबत संजय दत्त, पलक तिवारी आणि सनी सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT