Malaika Arora  Sam Tv
मनोरंजन बातम्या

Malaika Arora: फॅनने फोटो काढताना मलायकाच्या कमरेवर ठेवला हात, बॉडीगार्ड जवळ आला अन्...

Malaika Arora With Fan: मलायका अरोरा सध्या 'झलक दिखला जा'च्या सीझन 11 मध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. या शोच्या सेटबाहेर मलायाकाच्या चाहत्यांची नेहमीच गर्दी असते. आपल्या नवनवीन स्टाइल आणि लूकमध्ये मलायका अरोरा या शोमध्ये हजेरी लावत असते.

Priya More

Malaika Arora Viral Video:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कधी घराबाहेर, तर कधी पार्टींमध्ये, तर कधी जिमच्या बाहेर मलायका अरोरा स्पॉट होत असते. तिचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मलायका अरोराला पाहून तिच्यासोबत फोटो काढण्याचा मोह चाहत्यांना आवरत नाही. अशामध्ये मलायका देखील कधीच चाहत्यांना नाराज करत नाही. ती आवर्जुन चाहत्यांना सेल्फी काढण्याची संधी देते.

अशातच मलायका अरोराने आपल्या एका दिव्यांग चाहत्याची इच्छा पूर्ण केली आहे. मलायकासोबत फोटो काढण्यासाठी आलेल्या तिच्या या दिव्यांग चाहत्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

मलायका अरोरा सध्या 'झलक दिखला जा'च्या सीझन 11 मध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. या शोच्या सेटबाहेर मलायाकाच्या चाहत्यांची नेहमीच गर्दी असते. आपल्या नवनवीन स्टाइल आणि लूकमध्ये मलायका अरोरा या शोमध्ये हजेरी लावत असते. अशामध्ये मलायका अरोराचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिचा एक दिव्यांग चाहता फोटो काढण्यासाठी आल्याचे दिसत आहे. हा चाहता मलायकाच्या कमरेवर हात ठेवून उभा राहतो. मलायका देखील हसत-हसत त्याला पोझ देताना दिसते. पण अचानक मलायकाचा बॉडीगार्ड येतो आणि तो तिच्या कमरेवरचा हात काढण्यास या चाहत्याला सांगतो.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मलायका अरोराने लाल रंगाची डिझायनर साडी नेसली आहे. ती या लूकमध्ये खूपच मनमोहक आणि आकर्षक दिसत आहे. यावेळी मलायकासोबत फोटो काढण्यासाठी तिचा दिव्यांग चाहतो येतो. त्याची विनंती ऐकून मलायका त्याला फोटो काढण्यासाठी परवानगी देते. त्यानंतर हा दिव्यांग चाहता मलयाकाच्या कमरेवर हात ठेवून फोटो काढण्यासाठी उभा राहतो. त्याच्याकडे नजर जाताच मलायकाचा बॉडीगार्ड येतो आणि तो तिच्या कमरेवरचा हात काढून टाकतो. सध्या मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मलायका अरोराने यावेळी नेसलेल्या लाल रंगाच्या साडीची किंमत ४८,५०० रुपये इतकी आहे. मलायका अरोरा 'झलक दिखलाजा सीझन 11' च्या एका एपिसोडसाठी जवळपास 15 लाख रुपये मानधन घेते. म्हणजेच ती आठवड्याला ३० लाख रुपये मानधन घेते. या शोच्या सेटवरील अनेक व्हिडीओ आणि मलायकाचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. या शोमध्ये मलायकासोबत अर्शद वारसी आणि फराह खान जजच्या भूमिकेत आहेत. तर गोहर खान आणि ऋत्विक धनजानी हे हा शो होस्ट करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT