Mahima Chaudhry SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mahima Chaudhry : आणखी एक स्टारकिड बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार; १८ व्या वर्षी चित्रपटात झळकणार? सौंदर्यावर चाहते फिदा

Mahima Chaudhry Daughter Bollywood Debut : बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीच्या मुलीची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. मुलीच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल महिमा चौधरी काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अभिनेत्री महिमा चौधरीने लेकीच्या बॉलिवूड डेब्यूवर मोठा खुलासा केला आहे.

महिमा चौधरीची लेक सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चेत आहे.

अरियानाच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीची मुलगी अरियाना चौधरी कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. ती सोशल मीडियावर सक्रिय असते. अरियाना 'नादानियां' चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये दिसली होती आणि तेव्हापासून ती खूप चर्चेत आहे. अशात आता महिमाने अरियानाच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

फिल्मी ज्ञानच्या मुलाखतीत महिमा चौधरी मुलीच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलली की, "लवकरच नाही, पण हो बॉलिवूडमध्ये येईल... मला चित्रपट आवडतात. मला क्रिएटिविटी आवडते आणि ती माझ्या इतिहासाचा एक भाग व्हावी अशी माझी इच्छा आहे. मला ते खूप आवडते कारण मला वाटते की माझ्या आयुष्यात मी हा सेटअप निर्माण केला आहे. आणि मुंबईपेक्षा चांगले काहीही नाही. म्हणून, मी तिलाही येथे राहायचे आहे."

फिल्मी ज्ञान सोबतच्या संभाषणात, महिमा तिच्या मुलीबद्दल बोलली. तिने एरियानाच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दलही भाष्य केले. ती म्हणाली, "लवकरच नाही. पण हो. मला चित्रपट आवडतात." मला सर्जनशीलता आवडते आणि ती माझ्या इतिहासाचा एक भाग बनवायची आहे. मी जो आयुष्यात सेटअप केला आहे. तो येथेच केला आहे. मुंबईपेक्षा चांगले काहीही नाही. म्हणून मला वाटते की तिने इथेच राहावे..." 2007 मध्ये जन्मलेली अरियाना आता १८ वर्षांची आहे. तिने नुकतीच हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली आहे.

वर्कफ्रंट

महिमा चौधरी अलीकडेच 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' या चित्रपटात दिसली. चित्रपटात ती संजय मिश्रा यांच्यासोबत झळकली. यापूर्वी 'नादानियां' चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने खुशी कपूरच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका केली होती. महिमा चौधरीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे लाखो चाहते दिवाने आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Price: २० वर्षांपूर्वी 1KG चांदीची किंमत किती होती? १५०० टक्क्यांनी झाली वाढ

Skin Care : चेहऱ्यावर ब्लीच करण्याआधी 'या' पाच महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या

Rohit Sharma: रोहित भाऊ, वडापाव खाणार का? चाहत्याच्या प्रश्नावर हिटमॅनने दिलं त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर, Video व्हायरल

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरुपसिंग नाईक अनंतात विलीन...

Amla Benefits: वजन कमी होते, केस गळणे कमी होते...; रोज सकाळी एक आवळा खल्ल्याने होतात हे आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT