Manasvi Choudhary
अभिनेत्री महिमा चौधरी वयाच्या ५२ व्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
महिमाने दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याने ज्यामुळे तिच्या चाहत्यांसह सर्वांनाच धक्का बसला आहे.
५२ वर्षीय महिमा चौधरीने ६२ वर्षीय संजय मिश्राशी दुसऱ्यांदा लग्न केलं असल्याचं बोललं जात आहे.
दोघांचेही फोटो सध्या व्हायरल होत आहेत ज्यामध्ये या दोघांचा लग्नातील खास लूक दिसत आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का? खऱ्या आयुष्यात महिमा आणि संजय यांनी लग्न केलेले नाही.
आगामी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त त्यांनी असा लूक केला आहे. 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' असं त्यांच्या चित्रपटाचे नाव आहे.