Madhuri Dixit SAAM TV
मनोरंजन बातम्या

Madhuri Dixit : उनसे मिली नजर…; 'धकधक गर्ल'च्या दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ, पाहा VIDEO

Madhuri Dixit Dance Video : बॉलिवूडची क्वीन माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर एक खास डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आजवर तिने अनेक हिट चित्रपट केले आहेत. तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. 90चे दशक तिने गाजवले आहे. तिने हिंदीसोबत मराठी चित्रपटात देखील काम केले आहे.

माधुरी दीक्षित अभिनयासोबतच तिच्या नृत्यासाठी देखील ओळखली जाते. तिच्या दिलखेचक अदांनी ती कायम प्रेक्षकांना घायाळ करते. माधुरी दीक्षित सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो आणि डान्सचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच तिने आपला एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून चाहते तिच्या पुन्हा प्रेमात पडले आहे.

माधुरी दीक्षितने 'उनसे मिली नजर के मेरे होश उड़ गये…' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. व्हिडीओमध्ये माधुरी 'जब वो मिले मुझे पहली बार...' या गाण्यातील ओळीवर डान्स करताना दिसत आहे. तिने डान्ससाठी रेट्रो लूक केला आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. मरून रंगाची वेलवेट साडी नेसली आहे. रेट्रो हेअरस्टाइल, मोत्यांची दागिने तिने परिधान केले आहेत. गाण्यावर तिचे हावभाव, तिच्या अदा पाहून चाहते दिवाने झाले आहेत.

माधुरीने या डान्स व्हिडीओला एक हटके कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "Retro vibes for the win" माधुरी दीक्षितच्या डान्स व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. 'उनसे मिली नज़र' हे गाणे 'झुक गया आसमान' या चित्रपटाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT