Pulkit Samrat And Kriti Kharbanda Wedding Instagram
मनोरंजन बातम्या

Pulkit And Kriti Wedding: क्रिती खरबंदा- पुलकित सम्राट अडकले विवाह बंधनात; लूकने वेधले लक्ष

Chetan Bodke

Pulkit Samrat And Kriti Kharbanda Wedding

बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या लगीनघाई सुरू आहे. एकापाठोपाठ एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरूवात करत आहेत. नुकताच रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचा थाटामाटामध्ये विवाहसोहळा पार पडला. (Bollywood)

रकुलनंतर आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे.. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंडा आणि अभिनेता पुलकित सम्राटने आज लग्नगाठ बांधली आहे. दोघांचा लग्नसोहळा अगदी धुमधडाक्यात पार पडला आहे. नुकतंच क्रिती आणि पुलकितने लग्नसोहळ्याचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Bollywood Actor)

क्रिती आणि पुलकितने लग्नामध्ये एकदम खास लूक केलेला दिसत आहे. लग्नामध्ये क्रितीने पिंक कलरचा लेहेंगा आणि डायमंड ज्वेलरी असा लूक कॅरी केला होता. तर पुलकितने लग्नामध्ये सी ग्रीन कलरची शेरवानी आणि फेटा परिधान केला होता. सध्या चाहत्यांमध्ये, पुलकितच्या शेरवानीवरील डिझाईनची जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्रीने लग्नातले खास क्षणांचे फोटो शेअर करताच ते इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहेत. (Bollywood Actress)

अभिनेत्रीने लग्नाचे फोटो शेअर करताना कॅप्शन दिले की, "From the deep blue sky, To the morning dew. Through the low and the high, It’s only you. From the start to the end, In every now and every then, When my heart beats different, It’s got to be you. Constantly, Consistently, Continually, You!" दरम्यान, पुलकितचं हे दुसरं लग्न आहे. त्याने आधी २०१४ मध्ये, श्वेता रोहिरासोबत लग्न केले होते. श्वेता ही सलमान खानची 'राखी सिस्टर' आहे. पण पुलकित आणि श्वेता यांचा संसार जास्त दिवस काही टिकला नाही. पुलकित आणि श्वेता यांचा २०१५ मध्ये घटस्फोट झाला. (Bollywood News)

३० जानेवारीला क्रिती आणि पुलकितचा रोका सेरेमनी पार पडला. त्याचे फोटो या कपलने शेअर केले होते. यावेळी फक्त कुटुंब आणि काही मित्र उपस्थित होते. दरम्यान, पुलकीतने ‘बिट्टू बॉस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'पागलपंती' चित्रपटाच्या सेटवर पुलकित आणि क्रितीच्या लव्हस्टोरीला सुरूवात झाली. या सेटवरच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती ५०० कोटींच्या घोटाळ्यात अडकली?

Haryana Election Exit Poll Result : हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर 'आप'ला शून्य जागा; एक्झिट पोलची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

२ चिमुकली मुलं, अंबरनाथमधून गायब, कल्याणमधून अपहरण अन् पालघरला थरार...

National Park: प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

SCROLL FOR NEXT