Katrina Kaif  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif : कतरिना कैफ बनली मालदीवची 'ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर'

Katrina Kaif Ambassador : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ मालदीवची 'ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर' बनली आहे. ती नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) कायम तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र आता कतरिना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच बॉलिवूडची हिरोईन कतरिना कैफ मालदीवची 'ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर' झाली आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे.

मालदीव मार्केटिंग अँड पब्लिक रिलेशन्स कॉर्पोरेशन (एमएमपीआरसी) ने मंगळवारी मालदीवच्या 'ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर' ची घोषणा केली. कतरिना कैफला मालदीवच्या 'ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर' (Global Brand Ambassador Of Maldives Tourism) केल्यावर आपल्या भावना व्यक्त करत एमएमपीआरसीचे व्यवस्थापकीय संचालक थोयिब मोहम्मद म्हणाले, "कतरिना कैफ मालदीवच्या 'ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर' असणे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मनोरंजन आणि उद्योगातील तिची लोकप्रियता आम्हाला जगभरातून भारतातून अधिकाधिक मालदीवमध्ये येण्यासाठी पर्यटनाचे आकर्षण वाढवण्यास मदत करेल. "

मालदीवची 'ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर' झाल्यावर कतरिना कैफ म्हणाली की, "मालदीवला निसर्ग सौंदर्यासोबत शांतता देखील आहे.सनी साईड ऑफ लाईफचा चेहरा म्हणून माझी निवड झाल्याबद्दल मला अभिमान आहे. जगभरातील लोकांना मालदीवला जाण्यासाठी जागतिक दर्जाच्या ऑफर शोधायला मी उत्सुक आहे. "

पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मालदीवच्या युवा मंत्र्यांनी नकारात्मक भाष्य केले होते. तेव्हा देशाने 'बॉयकॉट मालदीव'ची मोहीम राबवली होती. मालदीवला फिरायला न जाण्याचा निर्णय घेतला होता. मालदीवचे बुकिंग्स रद्द केले होते. कतरिना कैफने अभिनयसोबत डान्स आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT