Raat Akeli Thi Song Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Merry Christmas: 'मेरी ख्रिसमस'मधील 'रात अकेली थी' गाणं रिलीज, एकमेकांच्या प्रेमात बुडाले कतरिना कैफ आणि विजय सेतुपती

Raat Akeli Thi Song Out: 12 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टीझर, ट्रेलर आणि २ गाण्यांनंतर आता तिसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यालाही प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Priya More

Merry Christmas New Song:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaife) आणि साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांच्या 'मेरी ख्रिसमस' चित्रपटाची (Merry Christmas Movie) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 12 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टीझर, ट्रेलर आणि २ गाण्यांनंतर आता तिसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

या चित्रपटातील 'रात अकेली थी' हे तिसरे गाणे रिलीज झाले आहे. हे स्लो मोशन गाणं हृदयाला स्पर्श करणारे आहे. या गाण्यात कतरिना कैफ आणि विजय सेतुपती एकत्र क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहेत. सस्पेन्सने भरलेल्या या गाण्यात चित्रपटातील इतर काही भयानक दृश्यही दाखवण्यात आली आहेत.

'मेरी ख्रिसमस' चित्रपटातील हे तिसरे गाणं आहेत. 'रात अकेली थी' रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाण्यात कतरिना आणि विजय एकत्र खूप छान दिसत आहेत. या गाण्यात दोघेही एकमेकांसोबत काही क्षण एकटे घालवताना दिसले होते. हे संपूर्ण गाणं रात्री चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात कतरिना आणि विजय रोमान्स करताना देखील दिसत आहेत.

हे गाणे अरिजित सिंगने आपल्या मंत्रमुग्ध आवाजात गायले आहे. या गाण्याला प्रीतमने संगीत दिले आहे. याआधी चित्रपटाचा टायटल ट्रॅक आणि 'नजर तेरी तुफान' रिलीज झाले होते. ही सर्व गाणी स्लो मोशनवर आधारित आहेत. 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट १२ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट हिट व्हावा यासाठी कतरिना आणि विजय सेतुपती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहेत. हे दोन्ही स्टार्स मुंबईत एकत्र स्पॉट होत आहेत.

'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून कतरिना आणि विजय पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. कतरिना कैफ या चित्रपटाआधी 'टायगर 3'मध्ये दिसली. या चित्रपटात कतरिनासोबत सलमान खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. तर त्याआधी ती शाहरुख खानच्या 'जवान'मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : कामात तुमची चर्चा होईल! 5 राशींच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

MLC Election: नागपूरमध्ये भाजपचा पराभव; पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट

प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात तणाव; राजेंद्र शिंदेंच्या अटकेसाठी ठाणे जाम

MLC Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत धक्कादायक निकाल; ठाकरे गटाच्या उमेदवारासह 41 पैकी 39 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

विधानपरिषदेत रीलस्टार्सनं पाजलं दिग्गजांना पाणी, विद्यमान आमदारांच्या विजयाचं गणित बिघडवलं

SCROLL FOR NEXT