Kajol Net worth And Education Saam TV
मनोरंजन बातम्या

HBD Kajol : १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये झळकणारी काजोल कोट्यवधींची मालकीण; पण शिक्षण अर्धवट राहिले म्हणून...

Kajol Birthday : काजोलने बॉलिवूडमधील तिच्या करियरची सुरुवात बेखुदी या चित्रपटापासून केली.

Pooja Dange

Kajol Net Worth : बॉलिवूडमधील एक जबरदस्त अभिनय करणारी अभिनेत्री म्हणून काजोल ओळखली जाते. काजोलने एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर राज्य केले आहे. व्हायच्या १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी काजोल आज ४९ वर्षाची झाली आहे.

काजोलने बॉलिवूडमधील तिच्या करियरची सुरुवात बेखुदी या चित्रपटापासून केली. परंतु तिला खरी ओळख मिळाली ती शाहरुख खानच्या बाजीगर या चित्रपटातून. त्यानंतर काजोलने शाहरुखसोबत डीडीएलजे, कुछ कुछ होता है, कभी खूशी कभी गमसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

९०च्या दशकात अगडीची अभिनेत्री असलेल्या काजोलने वयात चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. १६ वर्षाची असताना काजोलला राहुल रवैल यांच्या बेखुदी चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिचे शिक्षण अर्धवट राहिले. काजोलने शाळेत जाण्याचा विचार केला होता परंतु एका पाठोपाठ एक चित्रपट मिळत गेले आणि तिला पुन्हा शाळेत जात आलं नाही. (Latest Entertainment News)

काजोलने तिच्या करियरमध्ये खूप यश मिळवले. मीडिया रेपोट्सनुसार २०२१ पर्यंत काजोलकडे १८० करोड रुपयांची संपत्ती होती. परंतु लेटेस्ट अपडेट अजून आलेले नाहीत. तर काजोलने तिच्या आईला काही दिवसांपूर्वी एक नवे घर घेऊन दिले आहे. तसेच अजय देवगणने नुकतीच तिच्या नावावर काही प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

काजोलने नुकतेच 'द ट्रायल' या वेबसीरीजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले आहे. या सीरीजमध्ये काजोल वकील आहे. काजोल तिची मुलगी न्यासामुळे नेहमीच ट्रोल होत असते.

काजोल अभिनेता - दिग्दर्शक- निर्माती शुभान समर्थ यांची नातं आहे. १९३०च्या दशकातील अभिनेत्री आणि गायिका रतनबाई यांची पंती आहे. चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी आणि अनुभवी कलाकार तनुजा यांची मुलगी आहे. काजोल राणी मुखर्जी आणि अयान मुखर्जी यांची चुलत बहीण आहे.

काजोलने 'गुप्त' या चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिका साकारली ज्यासाठी तिला फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता. नकारात्मक भूमिकेसाठी काजोल पहिली अभिनेत्री आहे. २०११ साली काजोलला पदमश्री देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय काजोलला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT