Jaya Bachchan And Aishwarya Rai Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jaya Bachchan: 'मी सुनेच्या मागून राजकारण करणारी सासू...', ऐश्वर्याच्या नात्यावर जया बच्चन जरा स्पष्टच बोलल्या

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा बऱ्याचदा सुरू होत्या. अशातच जया बच्चन यांच्या एका मुलाखतीची बरीच चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Jaya Bachchan And Aishwarya Rai Bachchan: सासू सुनेच्या नात्यात नेहमीच चढ उतार असतो, कधी एकमेकींमध्ये वादाचे खटके उडतात तर कधी खूप चांगल्या मैत्रिणी म्हणून समाजात वावरतात. अनेक सेलिब्रिटी सासू सुनांच्या देखील अनेकदा चर्चा होतात. तशीच एक जोडी म्हणजे जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा बऱ्याचदा सुरू होत्या. त्यांच्यातील नाते कसे आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. नुकताच एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत जया बच्चन यांनी त्यांच्यातील नाते स्पष्ट केले.

२०१० मध्ये एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत जया बच्चन म्हणतात, "ऐश्वर्या त्यांची सून तर आहेच पण सोबतच आम्ही दोघी फार चांगल्या मैत्रिणी आहोत. आम्ही दोघीही एकमेकींना आमच्यातील गॉसिप्स शेअर करत असतो." यावेळी जया बच्चन यांनी ऐश्वर्याची न आवडणारी गोष्ट देखील सांगितली आहे.

ऐश्वर्याची न आवडणारी गोष्ट सांगताना जया बच्चन म्हणतात, “ऐश्वर्याची एखादी गोष्ट मला आवडली नाही तर मी तिला ते सरळ स्पष्ट भाषेत बोलून टाकते. मी तिच्या पाठीमागून कोणतही राजकारण करत नाही.”

सोबतच पुढे जया बच्चन म्हणतात, "आमच्या दोघींमध्ये ही फरक इतकाच आहे की, मी जरा जास्तच नाटकं करते, कारण तिने माझा आदर करावा. आमच्या दोघींमध्ये वयाचा फरक असला तरी, आम्ही ती बाब कधीच स्पष्ट होऊन दिली नाही."

"आम्हाला दोघींनाही घरात बसून रिकाम टेकड्या गोष्टींवर बोलायला फार आवडतं. अर्थात तिच्याकडे फार कमी वेळ असतो बोलायला, पण तरीही आम्ही जेव्हा एकत्र बसतो तेव्हा फार बोलतो. माझी आई आणि ऐश्वर्या जेव्हा माझ्या बद्दल बोलतात तेव्हा त्या दोघीही बंगाली भाषेत संवाद साधतात. माझी आई मूळ बंगाली. आणि ऐश्वर्या ‘चोखेर बाली’च्या वेळी बंगाली शिकली होती. त्यामुळे त्या दोघींचंही फार चांगली मैत्री आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महिलांच्या खात्यात १०,००० जमा करा- उद्धव ठाकरेंची मागणी

Sameer Wankhede: 'मला पाकिस्तान आणि बांगलादेशकडून धमकीचे मेसेज...' समीर वानखेडेंचा दावा

Bhaubeej Gifts : कपडे- ज्वेलरी नाही; यंदा भाऊबीजेला लाडक्या बहिणीला द्या 'या' भन्नाट भेटवस्तू

Pakistan Terror Attack : पोलीस प्रशिक्षण केंद्रावर दहशतवादी हल्ला; ७ पोलिसांचा जागीच मृत्यू, १३ जखमी

BMW Car Sales: BMW आवडे आम्हाला! ३ महिन्यांत कारच्या मागणीत २१%नी वाढ

SCROLL FOR NEXT