Janhvi Kapoor Maldives vacation story Instagram @janhvikapoor
मनोरंजन बातम्या

Janhvi Kapoor: जान्हवीचा वॅकेशन मोड ऑन, मालदिवमध्ये खास व्यक्तीसोबत हॉलिडे एन्जॉय

जान्हवी मालदीवमध्ये गेली असून तिथले अनेक फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Pooja Dange

Janhvi Kapoor Maldives Vacation Photo: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या अभिनयाने आणि फॅशनने चाहत्यांना नेहमीच आश्चर्यचकित करत असते. जान्हवी नेहमीच तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या जान्हवी सुट्टीचा आनंद घेत आहे. जान्हवी मालदीवमध्ये गेली असून तिथले अनेक फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोची आता चर्चा होत आहे.

जान्हवी कपूरने तिचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती चंद्रप्रकाशात ग्लॅमरस कट आउट ड्रेसमध्ये पोज देत आहे. तसेच तिने इन्स्टावर फोटो शेअर करत लिहिले आहे की, फिकट चंद्रप्रकाशात मला भेट (मीट मी इन द पेल मूनलाईट). तर जान्हवीच्या एक्स बॉयफ्रेंड शिखरने फोटो लाइक केले आणि कमेंटमध्ये मून स्पिरिट असे लिहिले आहे.

शिखरने सुद्धा त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरून तसेच चंद्राचा एक फोटो त्याच्या स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अथांग समुद्र आणि चंद्रप्रकाश आणि चंद्र दिसत आहे. दोघांचेही हे चंद्रप्रेम पाहून लोक चर्चा करू लागले आहेत. या दोघांच्या नात्याबद्दल पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.

Instagram story of Shikar Pahariya

शिखर पहारिया हा सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री होते. शिखरने आणि जान्हवी कपूरला याआधी एकमेकांना डेट करत होते पण नंतर दोघेही वेगळे झाले. कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनमध्ये दोघांच्या डेटिंगवर जान्हवीने शिक्कामोर्तब केला होता. अलीकडेच जान्हवीला शिखरसोबत हँग आउट करतानाही दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! गटविकास अधिकार्‍याचा कार्यालयात शेतकऱ्याचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न

Maharashtra News Live Update: TCS धर्मांतर प्रकरण; संशयितांच्या जामीन अर्जावर आज येणार निकाल

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

SCROLL FOR NEXT