बॉलिवूडची (Bollywood) दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माता- दिग्दर्शक बोनी कपूर (Bony Kapoor) यांची मुलगी जान्हवी कपूर आज आपला २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. जान्हवी कपूरवर (Janhvi Kapoor) सध्या तिचे चाहते आणि सिलेब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जान्हवी कपूरला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.
स्टारकिड्स असली तरी देखील जान्हवी कपूरने आपल्या दमदार स्टाइल आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या जान्हवी कपूरने अवघ्या काही चित्रपटांमध्ये काम करत याशाचे शिखर गाठले आहे. बॉलिवूडनंतर आता ती साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री करणार आहे. जान्हवी कपूरच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्या फिल्मी करिअर आणि नेटवर्थबद्दल जाणून घेणार आहोत...
जान्हवी कपूरचा जन्म 6 मार्च 1997 रोजी मुंबईत बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या घरी झाला. आज जान्हवी कपूरने बॉलिवूड इंडस्ट्रीत आपले पाय रोवले आहेत. आपले करिअर आणखी चांगले बनवण्यावर तिने लक्ष केंद्रित केले आहे. जान्हवीचा लहानपणापासूनच अभिनयाकडे कल होता. पण श्रीदेवीला मुलगी जान्हवीला डॉक्टर बनवायचे होते. पण जान्हवीला तिच्या आईप्रमाणे अभिनेत्री बनून प्रसिद्धी मिळवायची होती. अखेर श्रीदेवीनेही आपल्या मुलीची इच्छा समजून ती मान्य केली. पण दुर्दैवाने तिच्या मुलीचा डेब्यू चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस आधीच श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतला. 24 फेब्रुवारी 2018 मध्ये श्रीदेवी यांचे निधन झाले.
जान्हवी कपूरने मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर जान्हवीने लॉस एंजेलिसमधील 'द ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूट'मधून थिएटर अॅक्टिंगचा कोर्स केला. यानंतर जान्हवीने फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचा कोर्सही केला. त्यानंतर तिने 2018 मध्ये 'धडक' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
'धडक' चित्रपटानंतर जान्हवी कपूरने 'गुंजन सक्सेना', 'रुही', 'गुड लक जैरी', 'मिली' आणि 'बवाल' या चित्रपटामध्ये काम केले. बॉलिवूड चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर आता जान्हवी कपूर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी तयार झाली आहे. लवकरच ती साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. जान्हवी कपूर 'देवरा' चित्रपटमध्ये काम करणार आहे. या चित्रपटात ती ज्यूनिअर एनटीआरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. सैफ अली खान देखील या चित्रपटामध्ये काम करणार आहे. या चित्रपटासाठी जान्हवी तेलुगू शिकत आहे. याव्यतिरिक्त ती 'मिस्टर अॅण्ड मिसेस माही', आणि 'उलझ' या चित्रपटामध्ये देखील काम करणार आहे.
जान्हवी कपूर सध्या रॉयल लाइफ जगते. अगदी कमी वयात तिने आपल्या करिअरमध्ये यश मिळवले आहे. जान्हवी कपूर चित्रपटांसोबतच जाहिरातींमध्ये देखील काम करते. या माध्यमातून ती कमाई करते. एवढ्या लहान वयात तिच्याकडे भरपूर संपत्ती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जान्हवी कपूरची एकूण संपत्ती 82 कोटी रुपये आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करते. याशिवाय ती स्टेज परफॉर्मन्स आणि मॉडेलिंगमधूनही भरपूर कमाई करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.