Soumya Shetty Arrested: साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक, मैत्रिणीच्या घरातून केली 1 किलो सोन्याची चोरी

Soumya Shetty: शाखापट्टनम पोलिस ठाण्यात सौम्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली आहे. सौम्याला अटक झाल्याचे कळताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.
Soumya Shetty Arrested
Soumya Shetty ArrestedSaam Tv
Published On

South Actress Soumya Shetty:

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून (South Film Industry) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध तेलुगू अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर सौम्या शेट्टीला (Soumya Shetty) पोलिसांनी अटक केली आहे. सौम्यावर चोरीचा आरोप आहे. मैत्रिणीच्या घरातून एक किलोपेक्षा जास्त सोनं चोरल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तिला अटक केली आहे. विशाखापट्टनम पोलिस ठाण्यात सौम्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली आहे. सौम्या शेट्टीला अटक झाल्याचे कळताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सौम्यासोबत असं काही घडलंय यावर त्यांना विश्वास बसत नाहिये.

भारतीय टपाल विभागातील निवृत्त कर्मचारी प्रसाद बाबू यांनी त्यांच्या घरातून एक किलोपेक्षा जास्त सोने चोरी झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. यानंतर पोलिसांनी सौम्या शेट्टीला अटक केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, सौम्या शेट्टी अनेकदा प्रसाद बाबूच्या घरी जायची. सौम्या शेट्टीची प्रसाद बाबूची मुलगी मोनिकाशी मैत्री होती. सौम्या शेट्टीने मोनिकाची जीवनशैली पाहिली आणि तिचा हेतू बिघडला. पोलिसांनी सांगितले की, सौम्या शेट्टी बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने अनेकदा त्यांच्या बेडरूममध्ये जात राहिली आणि संधी मिळताच तिने मोनिकाच्या घरात चोरी केली. मोनिकाचे कुटुंबीय नातेवाईकाच्या लग्नावरून घरी परतले असता त्यांना सोने चोरीला गेल्याचे समजले.

याप्रकरणी पोलिसांनी सौम्याविरोधात गु्न्हा दाखल करत तिला अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणाच्या तपासाला देखील सुरूवात केली आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी बोटांचे ठसे आणि सीसीटीव्ही फुटेज घेतले आहे आणि काही लोकांची संशयाच्या भोवऱ्यात चौकशी करण्यात आली. या लोकांमध्ये सौम्या शेट्टीचाही समावेश आहे. चोरी करून सौम्या शेट्टी गोव्याला रवाना झाली आणि ऐशोआरामाचे जीवन जगत होती. सौम्या शेट्टीने चोरी केल्याची कबुली दिली आहे. सौम्या शेट्टीकडूनही पोलिसांनी काही सोने देखील जप्त केले आहे. सध्या पोलिस याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात व्यस्त आहेत.

दरम्यान, सौम्या शेट्टीने तेलगू इंडस्ट्रीतील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. सौम्या शेट्टी हे सोशल मीडियावर एक प्रसिद्ध नाव आहे. प्रभावशाली असण्यासोबतच ती एक प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहे. तिला सौम्या किल्लमपल्ली या नावानेही ओळखले जाते. इन्स्टाग्रामवर तिचे 1 लाख 18 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सौम्याची तक्रार करणारे प्रसाद यांची मुलगी मोनिकाशी मैत्री झाली होती.

Soumya Shetty Arrested
इडली-वडा राम चरण कुठे आहेस तू..., Shah Rukh Khanच्या वक्तव्यावरून अभिनेत्याची मेकअप आर्टिस्ट संतापली; VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com