Huma qureshi cousin killed Saam Tv News
मनोरंजन बातम्या

बॉलिवूड अभिनेत्रीच्या भावाची भररस्त्यावर हत्या; पार्किंगवरून वाद चिघळला अन्.. नेमकं काय घडलं?

Huma Qureshis Cousin Killed: दिल्लीतील निझामुद्दीनमध्ये पार्किंगच्या वादातून हुमा कुरेशी यांच्या चुलत भावाची हत्या झाली. स्कूटी पार्किंगवरून वाद झाला आणि त्यानंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

Bhagyashree Kamble

  • दिल्लीतील निझामुद्दीनमध्ये पार्किंगच्या वादातून हुमा कुरेशी यांच्या चुलत भावाची हत्या झाली.

  • स्कूटी पार्किंगवरून वाद झाला आणि त्यानंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

  • आसिफ कुरेशी यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र ते मृत झाले.

  • पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी यांचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याची पार्किंगच्या वादातून हत्या करण्यात आली आहे. स्कूटी पार्क करण्याच्या कारणावरून वादाला सुरुवात झाली. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. शेवटी आसिफ यांचा हल्लेखोरांनी जीव घेतला. ही घटना दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात घडली असून, पोलिसांनी काही तासांतच आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा निजामुद्दीनच्या जंगपुरा भागातील भोगल बाजार लेनमध्ये ही घटना घडली. स्कूटी घराच्या गेटवरून काढून बाजूला पार्क करण्यावरून वाद चिघळला. या कारणावरून आसिफवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आसिफ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेसंदर्भात हुमा कुरेशीच्या वहिनीनं सांगितले की, 'रात्री उशिरा माझ्या पतीचे आणि शेजाऱ्यांचे कडाक्याचे भांडण झाले. माझे पती ऑफिसवरून आले. तेव्हा त्यांनी पाहिलं आमच्या घरासमोर शेजाऱ्यांची गाडी उभी होती. यावेळी त्यांनी शेजाऱ्यांना स्कूटी इतर ठिकाणी स्कूटी पार्क करण्यास सांगितले मात्र, त्यांनी गाडी काढली नाही. माझ्या पतीला अपशब्द वापरून अपमानित केलं. तेव्हा हा वाद टोकाला गेला'.

'वाद विकोपाला गेल्यानंतर हाणामारी झाली आणि माझ्या पतीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात माझे पती गंभीररित्या जखमी झाले. हल्ला झाल्यानंतर त्यांना तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला', अशी माहिती मृत व्यक्तीच्या पत्नीनं दिली.

या घटनेनंतर तातडीने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी कारवाई करत संबंधित आरोपीला ताब्यात घेतलं. दरम्यान, पार्किंगच्या वादातून झालेल्या हत्येनंतर परिसरात खळबळ उडालीआहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महापौर निवडणुकीआधी भिवंडीत मोठी घडामोड, भाजपच्या नाराज नगरसेवकांना शिवसेनेकडून फोडण्याचे प्रयत्न

Organ Shutdown Timeline: मृत्यूनंतर सर्वात पहिला कोणता अवयव काम करणं बंद करतो? वाचा शरीरात कसे होतात बदल

Moong Dal Laddu Recipe : १०-१५ दिवस छान टिकतील असे मूग डाळीचे लाडू, जेवल्यानंतर खायला हेल्दी स्वीट डिश

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Bigg Boss Marathi 6 : 9 सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार; भाऊच्या धक्क्यावर कोण घेणार घराचा निरोप? 'हे' सदस्य Danger Zone मध्ये

SCROLL FOR NEXT