Hema Malini Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hema Malini birthday: १४ व्या वर्षी चित्रपटात पदार्पण करणाऱ्या हेमा मालिनी यांचा ड्रीम गर्ल पर्यंतचा प्रवास

उत्कृष्ट अभिनयाने आणि सौंदर्याने ओळखली जाणारी बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: उत्कृष्ट अभिनयाने आणि सौंदर्याने ओळखल्या जाणाऱ़्या हेमा मालिनी यांनी अवघ्या कोवळ्या वयात केले अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 16 ऑक्टोबर 1948 रोजी तामिळनाडू येथील अम्मानकुडीमध्ये हेमा मालिनी यांचा जन्म झाला. हेमा मालिनी यांनी जवळपास चार दशकांच्या त्यांच्या अभिनय कारकिर्दीत एकापेक्षा एक चित्रपटात (Movie) काम केले आहे. त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या हृदयात ताज्या आहेत, त्यामुळे त्यांना आजही बॉलिवूडची (Bollywood) ड्रीम गर्ल म्हटले जाते.

हेमा मालिनी (Hema Malini) यांचे वडील व्हीएस आर चक्रवर्ती हे तमिळ चित्रपटांचे निर्माते होते. ट्रेन क्लासिकल डान्सर असलेल्या हेमा मालिनी यांना चित्रपटांमध्ये करिअर करायचे होते. 1968 मध्ये हेमा यांनी 'सपनो का सौदागर' या चित्रपटातून आपला चित्रपट प्रवास सुरू केला. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी त्यांनी या चित्रपटात काम केले होते, या चित्रपटात त्या ज्येष्ठ अभिनेते राज कपूरसोबत दिसल्या होत्या. 1970 मध्ये हेमा मालिनी यांना 'जॉनी मेरा नाम' या चित्रपटात देवानंदसोबत काम करण्याची संधी मिळाली, या चित्रपटाला खूप यश मिळाले होते.

हेमा मालिनी यांनी काही गंभीर पात्रे साकारून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आणि त्या समीक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री (Actress) ठरल्या होत्या. हेमा यांनी 1975 मध्ये आलेल्या 'खुशबू' आणि 1979 मध्ये आलेल्या 'मीरा' या चित्रपटात त्यांच्या गंभीर अभिनयाने समीक्षकांना भुरळ घातली होती.

हेमा मालिनी यांनी 1972 मध्ये आलेल्या 'सीता और गीता' चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली होती, हा चित्रपट त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. 1975 च्या 'शोले' (Sholay) या आयकॉनिक चित्रपटात हेमा यांनी 'बसंती' नावाच्या मुलीची भूमिका केली होती. ती भूमिका अजरामर झाली. त्यांच्या चित्रपटलतील या व्यक्तिरेखेला आणि या चित्रपटाला प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत.

1977 मध्ये तिच्यासोबत ड्रीमगर्ल हा चित्रपट बनला होता, ज्यामध्ये धर्मेंद्र तिच्यासोबत दिसले होते, तसेच हेमा हिंदी सिनेविश्वाची ड्रीमगर्ल बनली होती. हेमाने 1980 मध्ये धर्मेंद्रसोबत लग्न केले. 'शोले', 'सीता और गीता', 'प्रेम नगर', 'आमिर गरीब', 'मेहबूबा चरस', 'ड्रीम गर्ल', 'किनारा', 'त्रिशूल', 'मीरा', 'कुदरत', 'अंधा कानून' , 'रजिया सुलतान', 'रिहाई', 'जमाई राजा', 'बागबान', 'वीर जरा' हे त्यांचे सर्वात यशस्वी चित्रपट आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

SCROLL FOR NEXT