Helen  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Helen : हेलन यांच्या फिटनेसचं रहस्य! ८५व्या वर्षी करता आहेत ट्रॅम्पोलिन जम्प, पाहा VIDEO

Helen Fitness : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री हेलन यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये त्या वर्कआऊट करताना दिसत आहे. तसेच त्यांनी भन्नाट डान्स देखील केला आहे.

Shreya Maskar

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री हेलन (Helen Fitness) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्या कायम आपल्या फिटनेस आणि स्टाइलकडे लक्ष देताना दिसतात. 85 वर्षांच्या हेलन आजही खूप फिट पाहायला मिळतात. त्या कायम व्यायाम करताना दिसतात. आता देखील त्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हेलन या वर्कआऊट करताना दिसत आहेत.

हेलन यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये त्या पिलेट्स व्यायाम, ट्रॅम्पोलिन जंप आणि डान्स करताना पाहायला मिळत आहे. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हेलन यांच्या फिटनेसचे रहस्य या व्हिडीओमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि नियमित व्यायाम करून त्या हेल्दी राहत आहेत. त्यांच्या निरोगी जीवनशैलीचे रहस्य हेच आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये हेलन या पायऱ्या चढ-उतरताना, ट्रॅम्पोलिनवर उडी मारताना, पायाचा आणि हाताचा व्यायाम करताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी हेलन 'मोनिका ओ माय डार्लिंग' गाण्यावर त्यांच्या हटके स्टाइलने डान्स करताना दिसत आहेत. पिलेट्स आपल्याला तरुण ठेवण्यास मदत करतात आणि नेहमी फिट राहण्यासाठी व्यायाम केला पाहिजे असे हेलन या व्हिडीओतून चाहत्यांना सांगत आहेत.

आजवर हेलन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. त्यांच्या लूक आणि डान्सचे तर चाहते दिवाने आहेत. 'शोले' हा त्यांच्या गाजलेला चित्रपट आहे. तर 'पिया तू अब तो आजा' या गाण्याने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buttermilk Benefits: जेवल्यानंतर छास का प्यावे? छास प्यायल्याने होतात हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं? आदिती तटकरेंनी सांगितली सगळी कारणं

Maharashtra News Live Update: नालासोपाऱ्यात परदेशी महिलेवर हल्ला

भाजप स्लो पॉयझन, शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय, कामाख्या देवीला माहितीय; माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा सनसनाटी आरोप

Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

SCROLL FOR NEXT