Hansika Motwani Photoshoot Instagram/ @ihansika
मनोरंजन बातम्या

Hansika Motwani: हंसिका आणि पतीचे रोमॅंटिक फोटोशूट चर्चेत, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

हंसिकाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोत होणाऱ्या पतीसोबत रोमॅंटिक पद्धतीने एकमेकांना प्रपोज करताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hansika Motwani Wedding: अनेक दिवसांपासून हंसिका मोटवानीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. पण ती कोणासोबत लग्न करणार हे अद्याप तरी स्पष्ट केले नव्हते, पण आता तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोत होणाऱ्या पतीसोबत रोमॅंटिक पद्धतीने एकमेकांना प्रपोज करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर हंसिकाचे हे फोटो दिसताच चाहत्यांनी, मित्रमंडळींनी आणि नातेवाईकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. फोटो शेअर करताच लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत होता आणि अजुनही कायम आहे.

हंसिका मोटवानीचा बॉयफ्रेंड आणि बिझनसमॅन सोहेल कथुरिया या दोघांनी सातासमुद्रापार फ्रान्समध्ये जाऊन एकमेकांना प्रपोज केला आहे. फ्रान्सच्या आयफिल टॉवरजवळ रस्त्याच्या मधल्या भागात मेणबत्त्यांनी हृदय बनवत त्यात प्रपोज केल्याचे दिसत आहे.

यावेळी दोघेही रोमॅंटिक स्टाईलमध्ये दिसून आले. सोबतच Marry Me हा शब्द गुलाबाच्या पाकळ्यांनी लिहित दोघांचाही सुंदर बॉंड दिसुन येत आहे. दोघांच्याही लग्नाची चाहत्यांना खूपच उत्सुकता लागली आहे.

हंसिका तिचा बिझनेस पार्टनर आणि बॉयफ्रेंड सोहेल कथुरियासोबत ४ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. हंसिका आणि सोहेलचे लग्न जयपूरमधील मुंडोटा फोर्ट आणि पॅलेसमध्ये होणार आहे. दरम्यान, हंसिकाच्या लग्नापूर्वीच्या विधींची माहिती समोर आली असून तिच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला 2 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सोहळ्याची सुरुवात सुफी नाईटने केली जाणार आहे.

3 डिसेंबर रोजी मेहंदी आणि संगीत विधी पार पडणार आहे. 4 डिसेंबरला सकाळी हंसिका आणि सोहेलचा हळदीचा कार्यक्रम होणार असून संध्याकाळी एकत्र सात फेरे घेणार आहेत. रात्री रिसेप्शन कॅसिनो-थीम आफ्टर-पार्टीसह पार पडणार आहे.

हंसिका आणि साहिल हे दोघेही 2020 पासून इव्हेंट प्लॅनिंग कंपनी चालवत आहेत. याच दरम्यान त्यांच्यात प्रेमामुळे अधिक जवळीक होऊ लागली. ते 2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. हंसिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 'राउडी बेबी' या तमिळ चित्रपटात दिसणार आहे. बालकलाकार म्हणून तिने इंडस्ट्रीत तिच्या करिअरची सुरुवात केली.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT