Genelia  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Genelia : टीम इंडियाच्या विजयानंतर सूनबाईंनी दिली सासूबाईंना जादू की झप्पी; जिनिलियाचा आनंद गगनात मावेना, पाहा PHOTO

Genelia Hug Mother In Law : टीम इंडियाच्या विजयानंतर जिनिलीया देशमुखने आनंदाने सासूबाईंना मिठी मारली आहे. तर मुलांनी डान्स करून आपला आनंद व्यक्त केला आहे.

Shreya Maskar

'आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025' मध्ये (ICC Champions Trophy 2025) टीम इंडियाने शानदार विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 251 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करत भारतीय संघाने 254 धावा करून अखेर विजय मिळवला. बॉलिवूडचे सेलिब्रिटीही टीम इंडियाचे अभिनंदन करताना पाहायला मिळत आहे. सध्या अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात जिनिलिया कुटुंबासोबत बसून मॅचचा शेवटचा क्षण पाहत आहे.

genelia

जिनिलीया देशमुखने इंस्टाग्रामवर एक खास स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यात जिनिलीया, तिची मुलं आणि तिची सासू एकत्र मॅच पाहताना दिसत आहे. घरी 'आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025' मध्ये टीम इंडियाच्या विजयावेळी जिनिलीयाच्या दोन्ही मुलं आनंदाने बेडवर उड्या मारताना दिसत आहे. तर स्वतः जिनिलीयाचाही आनंद गगनात मावत नाही आहे. तिने टीम इंडियाच्या विजयानंतर पटकन सूनबाईंनी मिठी मारली आहे. या क्षणाचा व्हिडीओ जिनिलीयाने शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये जिनिलीया (Genelia ) आणि सासूबाई आनंदाने टाळ्या वाजवताना दिसत आहेत. टीम इंडियाच्या विजयाचा आनंद देशमुख कुटुंबाला गगनात मावत नाही आहे. या व्हिडीओवर जिनिलीयाने हटके कॅप्शन लिहिलं आहे. "भारताच्या विजयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आणि आपण चॅम्पियन्स झालो..." सध्या सर्वत्रच टीम इंडियाचा जयजयकार होत आहे.

genelia

जिनिलीया देशमुखचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती आपले फोटो आणि अनेक मजेशीर व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. रितेश-जिनिलीयाच्या मुलांना क्रिकेट खूप आवडते. रितेश-जिनिलीया कायमच आपल्या मुलांना पाठिंबा देताना दिसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT