Esha Deol and Bharat Takhtani Divorce Instagram
मनोरंजन बातम्या

Esha Deol and Bharat Takhtani Divorce: ईशा देओल – भरत तख्तानीचा घटस्फोट; ११ वर्षांचा संसार मोडला

Chetan Bodke

Esha Deol and Bharat Takhtani Confirm Divorce

धर्मेंद्र देओल आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच अभिनेत्री ईशा देओल आणि पती भरत तख्तानी यांनी ११ वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले आहेत. याबद्दल दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ईशा आणि भरत यांच्या टीमकडून निवेदन देण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी निवेदनामध्ये परस्पर वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. (Bollywood)

देओल आणि पती भरत तख्तानी यांनी काल घटस्फोटाची घोषणा केली. एका निवेदनाच्या माध्यमातून या कपलने विभक्त होण्याचे जाहीर केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी निवेदनात म्हटले की, "आम्ही दोघांनीही एकमेकांच्या निर्णयाने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनामध्ये होत असलेले बदल आणि मुलांच्या भविष्याचा विचार करता आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाचा निर्णय अत्यंत महत्वाचा असून आम्ही कायमच मुलांच्या हिताचा विचार करू. कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा." असं त्यांनी निवेदनात जाहीर केलं. (Bollywood Actress)

ईशा आणि भरतला ६ वर्षांची राध्या आणि 4 वर्षांची मिरा अशा दोन मुली आहेत. ईशा आणि भरतने २९ जून २०१२ रोजी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं होतं. दोघांचं लग्न इस्कॉन मंदिरात पार पडलं होतं. लग्नाच्या पाच वर्षानंतर त्यांनी पहिल्या मुलीला जन्म दिला. आणि नंतर २०१९ मध्ये दुसऱ्या मुलीला जन्म दिला. नात्यामध्ये सर्व काही आलबेल सुरु असताना, अचानक वेगळा होण्याचा का निर्णय घेतला? असा सवाल चाहते विचारत आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

SCROLL FOR NEXT