Rakhi Sawant Real Name Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Real Name: बॉलिवूड 'ड्रामा क्वीन' राखी सावंत लावते दुसऱ्या वडिलांच नाव; खरं नाव आहे वेगळंच; कारण काय?

Rakhi Sawant Birthday Special :राखी कितीही बिन्धास्त दिसत असली तरी तिचा स्ट्रगल खुप कठिण आहे. राखीने तिच्या आयुष्यात कठिण प्रसंगाचा सामना केला आहे.

Manasvi Choudhary

राखी सावंत नेहमीच तिच्या अतरंगीपणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर राखी सांवतची मोठी फॅनफॉलोविंग आहे. राखीला पाहण्यासाठी फॅन्स देखील तितकेच उत्साही असतात. बॉलिवूड इंडस्ट्रीसह राखीने मराठीतही तिचं अनोखं स्थान निर्माण केलं आहे. राखी कितीही बिन्धास्त दिसत असली तरी तिचा स्ट्रगल खुप कठिण आहे. राखीने तिच्या आयुष्यात कठिण प्रसंगाचा सामना केला आहे.

अभिनेत्री, ड्रामा क्वीन राखी सावंत आज तिचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. राखीचा जन्म २५ नोव्हेंबर १९७८ मध्ये मुंबईत झाला आहे. राखी अत्यंत गरीब परिस्थितीतून आज मोठी झाली आहे. सुरूवातीला राखीकडे खायला पैसे नसायचे. यावेळी राखीने मिळेल ते काम करत दिवस काढले आहेत. राखी सावंतचं खर नाव देखील वेगळं आहे.

इंडस्ट्रीत येण्यापूर्वी राखीने बदललं नाव

राखीचं खरं नाव नीरू भेडा असं आहे. सुरूवातीला राखीच्या घरची परिस्थिती बिकट होती. एक वेळ खायला देखील त्यांना मिळत नसायचे. राखीची आई हॉस्पीटलमध्ये आया म्हणून काम करायची. याचवेळी राखीच्या आईने दुसऱ्यांदा लग्न केले. जुने दिवस विसरून जावे आयुष्याची नवीन सुरूवात व्हावी म्हणून राखीने देखील नीरू भेडा असं तिचं नाव बदलून राखी सावंत केले.

राखीने अनेकदा मुलाखतीत तिच्या कठीण काळाबद्दल सांगितले आहे. राखीचे वडील खूप स्ट्रीक होते. यामुळे अभिनय क्षेत्रात यायची देखील राखीला भिती होती. राखीला डान्स करण्याची आवड होती पण मी कधीच डान्सर किंवा अभिनेत्री होण्याचे ठरवले नव्हते. माझ्या आईला अभिनेत्री व्हायची इच्छा होती. पण परिस्थितीमुळे मिळेल ते काम माझी आई करायची. सुरूवातील इंडस्ट्रीत यायला सुरूवात केली तेव्हा माझे शोषण झाले. माझ्या फोटोंची मस्करी करण्यात आली. अनेकदा माझ्या शरीरावरून मला हिणवले गेले मात्र मी हरले नाही असं देखील तिने मुलाखतीत सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: हेल्दी आणि शायनी केस हवेत? मग 'हा' पदार्थ नक्की ट्राय करा, आठवड्याभरात दिसेल फरक

Fodnicha Bhat Recipe : ऑफिसवरून आल्यावर झटपट बनवा 'असा' चटपटीत फोडणीचा भात, आवडीने खातील सगळे

Gold Price: मागच्या वर्षीचा सोन्याचा दर काय होता?

Bihar Election : निवडणकीआधीच मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; फायरब्रँड नेता पक्षाला रामराम ठोकणार

Maharashtra Live News Update: पावसामुळे झेंडू फुलांची आवक घटली, दर मात्र वाढले

SCROLL FOR NEXT