Deepika Padukone Saam TV
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone : आई झाल्यावर दीपिका घेणार कामातून ब्रेक; स्वत: करणार बाळाचं संगोपन

Bollywood Actress Deepika Padukone : आता आई झाल्यावर दीपिका कामातून ब्रेक घेणार अशा चर्चा रंगत आहेत. तसेच ती प्रेग्नंसीनंतर स्वत: बाळाचा सांभाळ करणार असल्याचही बोलले जात आहे.

Apurva Kulkarni

बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पादुकोण तिची प्रेग्नंसी खुप एन्जॉय करत आहे. दीपिका आणि रणवीर सिंह यांनी वर्षाची सुरुवात बाळाच्या गुड न्युजने केली आहे. दरम्यान आता आई झाल्यावर दीपिका कामातून ब्रेक घेणार अशा चर्चा रंगत आहेत. तसेच ती प्रेग्नंसीनंतर स्वत: बाळाचा सांभाळ करणार असल्याचही बोलले जात आहे.

दीपिका पादुकोण सध्या सोशल मीडियावर प्रेग्नंसीबाबत अनेक अपडेट देत राहते. दीपिका सध्या तिची प्रेग्नंसी खुप एन्जॉय करत आहे. आपल्या चाहत्यांसोबत ती नेहमी सुंदर-सुंदर पोस्ट शेअर करत असते. अशातच दीपिकानं तिचा नो मेकअप असलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्या फोटोमध्ये तिच्या प्रेग्नंसीचा ग्लो दिसून येत आहे. तसेच ती तिच्या डोहाळ्याच्या पदार्थाबाबतही पोस्ट करत राहते. दरम्यान दीपिकाने अशातच अमिताभ बच्चनसोबत ब्लॉकबस्टर चित्रपट 'कल्कि 2898 एडी' मध्ये काम केल आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 1 हजार कोटींचा गल्ला जमा केला आहे. परंतु आता दीपिका तिच्या कामातून काही दिवस ब्रेक घेणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

दीपिका आई झाल्यावर कामातून ब्रेक घेणार असल्याचं बोललं जात आहे.. तसंच ती स्वत: बाळाचा सांभार करणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु याबाबत दीपिका आणि रणवीर यांच्याकडून कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही. दीपिका तिची प्रेग्नेंसी एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये असल्यानं सिनेसृष्टीपासून दूर आहे. दरम्यान दीपिकाने एका नव्या प्रोजेक्टलाही नकार दिल्याचं बोललं जात आहे.

टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार दीपिकाला एक इंटरनॅशनल वेब सीरीज 'द व्हाइट लोटस' च्या तिसऱ्या सीजनमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. परंतु तिने या प्रोजेक्टला साफ नकार दिला आहे. बोललं जात आहे की, दीपिका आई झाल्यानंतर स्वत: बाळाचा सांभाळ करणार आहे. ती तिच्या बाळाला पूर्ण वेळ देणार आहे. सध्या दीपिकाचा फोकस फक्त तिचं बाळ हेच आहे.

रिपोर्टनुसार दीपिकाला लहान मुलं खुप जास्त आवडतात. तसंच लहान बाळांकडे ती लगेच आकर्षित होते. त्यामुळे तिच्या बाळाचं संगोपन तिला स्वत: करायचे आहे. दीपिका आणि रणवीर सध्या त्याचं बाळ येण्याच्या प्रतिक्षेत आहे. दोघेही बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शिवसेना उमेदवाराला हरवण्यासाठी जादूटोणा ?

Crime News : सोलापूरमध्ये हैवानी बापाचं क्रूर कृत्य! पोटच्या जुळ्या मुलांची हत्या केली, नंतर स्वतःला संपवायला गेला अन्...

Chicken Biryani Recipe: हॉटेलसारखी चिकन बिर्याणी कशी बनवायची?

Amla Benefits: दररोज एक आवळा खल्ल्याने शरिराला काय फायदे होतात?

Nitesh Rane: नितेश राणे यांच्या शासकीय बंगल्याबाहेर सापडली बेवारस बॅग, सीसीटीव्ही VIDEO समोर

SCROLL FOR NEXT