Deepika Padukone SAAM TV
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone : दुआच्या आईचा रॅम्प वॉक पाहिलात का? कातिल अदांवर चाहते फिदा

Deepika Padukone Ramp Walk Video : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रॅम्प वॉक केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) नेहमीच आपल्या लूक आणि अभिनयाने चाहत्यांना घायाळ करत असते. दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडचे पावर कपल आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. गेल्या वर्षी दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर दीपिका पहिल्यांदाच रॅम्प वॉक करताना पाहायला मिळाली. तिचा रॅम्प वॉक करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दीपिका कायमच तिच्या हटके फॅशनसाठी ओळखली जाते. दीपिकाच्या स्टनिंग लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दीपिका पदुकोणने सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाचीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात रॅम्प वॉक केला. तिच्या कातिल अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत. रॅम्प वॉकसाठी दीपिकाने पांढरा कोट, टॉप आणि पँट असा लूक केला होता. लूकला मॅचिंग सब्यसाची नेकलेस, चोकर आणि डायमंड असलेली ज्वेलरी परिधान केली होती.

सब्यसाचीच्या वर्धापन दिनाला दीपिका पदुकोणने चार चाँद लावले. केसांचा सुंदर बन आणि चष्माने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दीपिकाच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. तिच्या स्टाइलचे कौतुक होत आहे. रॅम्प वॉक करतानाचा चेहऱ्यावरील आत्मविश्वास संपूर्ण लूकची शोभा वाढवत आहे. दीपिका या लूकमध्ये 'लेडी बॉस' वाटत आहे.

दुआच्या जन्मानंतर आता पुन्हा एकदा दीपिका कामाला सुरूवात करत आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दीपिका पदुकोणचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 80.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती कायम आपल्या लूकचे फोटो आणि फिटनेसबद्दल सोशल मीडियावर शेअर करत असते. दीपिकाचा स्वतःचा 82°E या नावाचा ब्युटी ब्रँड आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chest congestion: छातीत घट्ट पिवळा कफ साचलाय? हे 7 घरगुती उपाय करून पाहा, लगेच सैल होईल कफ

Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! ट्रकला धडकून पिकअपचा चेंदामेंदा; ६ भाविकांचा मृत्यू, १४ गंभीर जखमी

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, वैद्यकीय तपासणीला नकार; अंतरवाली सराटीत नेमकं काय घडतंय?

Lek Ladki Yojana : मुलींसाठी सरकारची मोठी योजना! ₹1.01 लाख थेट मदत; फक्त या कुटुंबांनाच मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध

SCROLL FOR NEXT