Deepika Padukone  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: दीपिकाला एका कृत्यामुळे सहन करावे लागते ट्रोलिंग, भर स्टेजवरच शाहरुखला केले...

काल झालेल्या पत्रकार परिषदेत दीपिका पदुकोण एका कृत्यामुळे कमालीची ट्रोल होत आहे.

Chetan Bodke

Deepika Padukone: 'पठान' चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर काल पहिल्यांदाच चित्रपटाची सर्व टीम माध्यमांसमोर आली. चित्रपटाने आता पर्यंत जगभरात ५४३ कोटींचा टप्पा पार केला असून भारतात चित्रपटाने २८० कोटींच्या आसपास कमाई केली आहे. चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर सर्वच कलाकार माध्यमांसमोर मनसोक्त संवाद साधला. यावेळी दीपिका एका कारणामुळे ट्रोल झाली.

चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यामुळे दीपिका आणि शाहरुख चांगलेच ट्रोल झाले होते. त्यानंतर दीपिकालाही माध्यमांसमोर भर स्टेजवर मिळालेले यश पाहून रडू आवरले नाही. पत्रकारांसह चाहत्यांसोबतही यावेळी दीपिकाने संवाद साधला. तसेच दीपिकाने स्टेजवर शाहरुख खानला किस केल्याने नेटकरी तिला आता ट्रोल करीत आहे.

दीपिका शाहरुखला किस करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर कमेंट करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले, “हे नक्की काय करत आहेत?” तर आणखी एक म्हणतो, “गौरी आणि रणवीरला बोलवा” एकाने तर चक्क शाहरुख खानला धमकीवजा कमेंट केली आहे, “थांब रणवीरला हा व्हिडीओ पाठवतो” अशा शब्दात नेटकऱ्यांनी आपला संताप सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.

‘पठान’मध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. सोबतच चाहत्यांना पाहुणा कलाकाराच्या रुपात सलमान खानची झलक पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षक आता चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

Pune : केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला कट मारला, पुण्यात ३२ वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा

SCROLL FOR NEXT