Daisy Shah Interview Statement News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Daisy Shah : त्यानं खोलीत बोलावलं, माझा हात धरला अन्...प्रसिद्ध अभिनेत्रीचा निर्मात्यावर गंभीर आरोप

Daisy Shah Interview Statement News : बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाहने ऑडिशनदरम्यान झालेल्या अयोग्य स्पर्शाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • डेझी शाहने ऑडिशनदरम्यान अयोग्य स्पर्शाचा आरोप केला

  • साऊथ चित्रपट निर्मात्यावर गंभीर आरोप

  • या खुलाशामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ

  • अभिनेत्रींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत

सलमान खानच्या चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलेल्या आणि 'भाईजान'च्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या, ४१ वर्षीय अभिनेत्री डेझी शाहने ऑडिशनदरम्यान तिला आलेला भयावह अनुभव सांगितला. प्रसिद्ध अभिनेत्री डेझी शाहने खळबळजनक दावा केला आहे की, एका निर्मात्याने तिला अयोग्य स्पर्श केला असल्याचं तिने म्हटलं आहे. एका मुलाखती दरम्यान तिने हे वक्तव्य केलं असून अभिनेत्री डेझी शाहने केलेल्या या वक्तव्यावरून मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली आहे.

डेझी शाहने नुकतीच 'द फ्री प्रेस जर्नल'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने खुलासा केला की, एका साऊथ चित्रपट निर्मात्याने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला होता. ती म्हणाली "आम्ही सहा-सात मुली त्याला भेटायला गेलो होतो. तो सगळ्यांना एकट्यात भेटत होता, पण मला ते आवडले नाही कारण त्याने मला स्पर्श केला आणि माझा हात धरला."

अभिनेत्रीने पुढे सांगितले, "मला कोणी स्पर्श केला तर भीती वाटते. मी मसाज करून घेत नाही, कारण मला स्त्रियांनी स्पर्श केलेलासुद्धा आवडत नाही, पुरुषांचा तर प्रश्नच नाही. त्या घटनेनंतर मी त्याच्या निर्मात्याशी पुन्हा संपर्क साधला नाही आणि पुन्हा कधीही तसे केले नाही."

अभिनेत्री डेझी शाहने आपल्या कारकिर्दीची सुरुवात नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्याकडे असिस्टंट म्हणून केली. अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी, तिने अनेक बॉलिवूड गाण्यांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले. तिने 'भद्रा' आणि 'बॉडीगार्ड' या चित्रपटांमधून मुख्य भूमिकेतून कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि नंतर सलमान खानच्या 'जय हो' (२०१४) या चित्रपटातून तिला बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती 'हेट स्टोरी ३' (२०१५) सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आणि तिने डान्स रिॲलिटी शो व टीव्ही शोमध्येही भाग घेतला आहे. आता डेझी लवकरच पलाश मुच्छलच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये मराठी अभिनेता श्रेयस तळपदे देखील झळकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad: कारने वाहतूक पोलिसासह तिघांना उडवलं, मुंबई-गोवा महामार्गावरील थरारक घटना

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

SCROLL FOR NEXT