Kareena Kapoor OTT Debut Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jaane Jaan Movie: बॉलिवूडची बेबो ओटीटीवर डेब्यु करणार, ‘जाने जान’मधला करीनाचा ग्लॅमरस लूक पाहिला का?

Kareena Kapoor's Jaane Jaan Web Film Teaser Released: करीना कपूर तिच्या वाढदिवशी अर्थात २१ सप्टेंबर रोजी एका चित्रपटाच्या ओटीटी क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

Chetan Bodke

Kareena Kapoor's OTT Debut

मध्यंतरी ‘चांद्रयान ३’ मुळे चर्चेत राहिलेल्या करीना कपूरची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. नुकतीच बॉलिवूडची बेबो म्हणून अवघ्या बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेल्या, करीना कपूर तिच्या वाढदिवशी अर्थात २१ सप्टेंबर रोजी ओटीटी क्षेत्रात पदार्पण करणार आहे. नुकताच तिने एका वेबफिल्मची घोषणा केली असून तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री आता ओटीटीवर डेब्यु करत आहे. नुकताच सुजॉय घोष दिग्दर्शित ‘जाने जान’ चा (Jaane Jaan)चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सुजॉय घोषच्या या चित्रपटामध्ये करीना कपूरसोबत विजय वर्मा आणि जयदीर पहलावत देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूडची बेबो अखेरची ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामध्ये झळकली होती. करीनासोबत या चित्रपटामध्ये अभिनेता अमिर खान देखील दिसला होता. करीना कपूरचा आणि अमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत फ्लॉप ठरल्यानंतर ते दोघेही कोणत्याही चित्रपटामध्ये झळकले नव्हते. पण मात्र आता करीनाने आपला मोर्चा ओटीटीकडे वळवला आहे.

करीना कपूरच्या अवघ्या सेकंदाच्या टीझरमध्ये, करीना कपूर खान एका वेगळ्याच भूमिकेत दिसून येत आहे. टीझरमध्ये तिच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘जाने जान’ च्या अवघ्या काही सेकंदाच्या टीझरमधून तिच्या भूमिकेची तुफान चर्चा होत आहे. ‘जाने जान’ चा हा टीझर नेटफ्लिक्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. टीझरमध्ये, करीना मद्यधुंद आवाजात माइकवरून ‘जाने जा’ हे गाणं गाताना दिसतेय, तर पुढे विजय वर्मा कारमधून उतरताना दिसतोय. एकंदरीत सर्व टीझर पाहून, हा एक फुल ऑफ थ्रिलर चित्रपट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चित्रपटाचा अधिकृत टीझर शेअर करताना कॅप्शन दिलंय की, चित्रपटाचे नाव ‘जाने जान’ आहे. हा चित्रपट येत्या २१ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवशीच चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित ‘जाने जान’ची कथा ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या जपानी कादंबरीवर आधारित आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटामध्ये करीना, एका घटस्फोटित सिंगल मदरच्या भूमिकेत दिसणार आहे. ती चुकून तिच्या एक्स पतीला मारते आणि शेजाऱ्याच्या मदतीने त्याला पोलिसांपासून लपवत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : चार्जरच्या वायरनं नवऱ्याने केला बायकोचा खून, नवऱ्याने स्वत:लाही संपवलं

Political News : 'शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं, आधी...'; वसंत मोरे यांचं खासदार दुबे यांना ओपन चॅलेंज

Pandharpur: चंद्रभागेत आंघोळ अन् धरली पंढरीची वाट, विठुरायाच्या दर्शनाआधीच हार्ट अटॅकनं मृत्यू; परिसरात खळबळ

GK: असे कोणते फळ आहे जे अर्धे कापल्यावर भाजी बनते?

Garam masala: कोणत्या भाज्यांमध्ये गरम मसाला वापरू नये?

SCROLL FOR NEXT