Anushka Sharma Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anushka Sharma Birthday: जाहिरात मिळाली अन् नशीबच पालटलं; अनुष्काचा बॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रवास...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Anushka Sharma Birthday: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. इडंस्ट्रीत तिचे नाव टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणले जाते. अनुष्का शर्मा आज ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवसांबद्दल चित्रपटसृष्टीतील तिच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया...

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माने हिंदी चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पाऊल टाकले. अनुष्काने तिच्या अभिनयानं सिनेमाविश्वात स्वत:च स्थान निर्माण केले आहे. शाहरूख खान, रणवीर सिंग अशा आघाडीच्या कलाकारांबरोबर अनुष्काने काम केले. उत्तम स्क्रिफ्टवर काम करत सुपरहिट चित्रपटांवर अनुष्काने तिचे नाव कोरले आहे. यशराज बॅनर्सच्या 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून अनुष्काने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि त्यानंतर तिने कधी मागे वळूनच पाहिलंच नाही.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना अनेकांना कठोर परिश्रम घ्यावे लागले. मात्र अनुष्का भाग्यवान कलाकारापैंकी एक आहे जिला फारसा संघर्ष करावा लागला नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे, २००७ मध्ये अनुष्का बंगळुरूमधील एका शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंगला गेली होती. त्यादरम्यान, एका दुकानात तिची भेट फॅशन विश्वातील प्रसिद्ध व्यक्ती वेंडेल रॉड्रिक्स यांच्याशी झाली आणि तिचं नशीबचं बदलून गेले. वेंडेल रॉड्रिक्स सुप्रसिध्द फॅशन डिझायनर आहेत.

जेव्हा वेंडेलने अनुष्काला पाहिले तेव्हा त्यांनी तिला मॉडेलिंग करण्याची ऑफर दिली, अनुष्कानेही होकार दिला. यानंतर एका फॅशन शोमध्ये भाग घेतला. अनुष्काने तिची मॉडेलिंगची सुरूवात लॅक्मे फॅशन वीकपासून केली आणि यामाध्यमातून पुढे अनुष्का बॉलिवूडकडे वळली

Actress Anushka Sharma And Fashion Designer Wendell Rodricks

पुढे,अनुष्कानं यशराज फिल्मसाठी ऑडिशन दिली आणि तिची निवड झाली. याचदरम्यान, २००८ मध्ये अनुष्काने 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटात काम केले. चित्रपटात अनुष्काने शाहरुख खानबरोबर काम केलं. चित्रपटातील अनुष्काच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. त्यानंतर अनुष्काने बदमाश कंपनी आणि बैंड बाजा बारात चित्रपटातून आपल्या अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतले. चित्रपटाच्या कारकिर्दीत अनुष्काने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

अनुष्का शर्मा अभिनेत्री असून निर्माती म्हणूनही ओळखली जाते. अनुष्का शर्मा निर्मित एनएच 10,फिल्लोरी, परी यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.आगामी काळात अनुष्का 'चकदा एक्स्प्रेस' या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिच्या आयुष्यावर आधारीत आहे.जो याचवर्षीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खात्यात खटाखट जमा होणार ₹3000; तारीख आली समोर

Winter Skin Health : हिवाळ्यात त्वचा काचेसारखी चमकेल, दररोज 'या' 5 पैकी कोणताही एक पदार्थ खा

Kidney Racket : ५० हजार घेतले, ७४ लाख झाले; कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी विकल्या किडन्या, विदर्भातील प्रकरणाने राज्यात खळबळ

Saturday Remedies: शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी करा 'हे' ३ सोपे उपाय; घरातील कटकटी होतील कायमच्या दूर!

SCROLL FOR NEXT