Anshula Kapoor Instagram/ @anshulakapoor
मनोरंजन बातम्या

Anshula Kapoor: अंशुला बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी परदेशात, खास व्यक्तीसोबत स्वप्न पूर्ण होत असल्याने 'आनंद गगनात मावेना'

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूर सध्या थायलॅंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिच्या दिलखेचक अंदांनी सोशल मीडियावर काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

Chetan Bodke

Anshula Kapoor: बॉलिवूड चित्रपटसृष्टीत स्टारकिड्स हा प्रकार काही नवा नाही. बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांचे मुलं येत्या वर्षात चित्रपटांतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूर सध्या थायलॅंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. नुकतेच तिने काही खास फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिच्या दिलखेचक अंदांनी सोशल मीडियावर तिने आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

ती सध्या थायलॅंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद एका खास व्यक्तीसोबत घेत आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूड चित्रपट लेखक रोहन ठक्करसोबत ती दिसत आहे. हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर होत आहे. त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्यांना अद्यापही पुष्टी मिळालेली नाही.

दोघांनीही थायलँडमध्ये आयोजित मरून 5 म्युझिक इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. ही व्हिडीओ अंशूलाने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी या दोघांमध्ये रिलेशन सुरु असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

अंशुलाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पार्टीतले काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये एका व्हिडिओमध्ये ती म्युझिक बँडच्या 'लव्ह समबडी' या हिट ट्रॅकवर डान्स करताना दिसत आहे.

'डोन्ट वॉना नो' या गाण्यावर तिच्यासोबत तिचा एक मित्रही दिसत आहे. त्यांच्या या रोमॅंटिक अंदाजातील फोटोंनी सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. ते दोघेही एकमेकांकडे सुंदर स्मितहास्य देत पाहत आहेत.

हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत अंशुला कपूरने लिहिले की, “वाढदिवसाच्या महिन्याची सुरुवात धमाकेदार झाली!!! खूप डान्स केला, थकवा कमी करण्यासाठी पहाटे 1 वाजता पायाचा मसाज हवा होता!! माझ्या स्वप्नातही मला वाटले नव्हते की मी कॉर्सेट घालून त्याचा आनंद घेत आहे!! आतापर्यंतच्या सर्वात आरामदायक, सुंदर कॉर्सेटबद्दल लीक्लॉथिंगको धन्यवाद!!"

अंशुला कपूरने तिच्या कॅप्शनमध्ये सांगितले की, तिचे एक बकेट लिस्टमधील स्वप्न पूर्ण झाले आहे. तिने हॅशटॅगसह मरून 5 आणि अबाउट लास्ट नाईट लिहिले. अंशुला आणि रोहनच्या डेटिंगच्या अफवांची चर्चा एका सोशल मीडियावरील पोस्ट पासून सुरु झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीच्या हवेची गुणवत्ता खालावली

Rice Hacks : भात शिजवताना १ तमालपत्र नक्की घाला; मिळतील 'हे' ६ फायदे

जरांगे-पाटील संधी साधूपणा करताय; भरत गोगावलेंचा टोला,शिंदेंवरील 500 कोटींच्या आरोपांवरून राजकारण तापलं!

Khardi Kasara : लोकल प्रवाशांसाठी खूशखबर! कसारा-खर्डी मार्गावर सुरू झाली तिसरी मार्गिका; प्रवास होणार सुपरफास्ट

Dombivli Water Cut : डोंबिवलीत सलग ३६ तास पाणी बंद; MIDC कार्यालयावर नागरिकांची धडक

SCROLL FOR NEXT