Rakhi Sawant Successful Surgery Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Successful Surgery : राखी सावंतवर कशी झाली सर्जरी ?, Ex Husband ने दिली हेल्थ अपडेट; खिल्ली उडवणाऱ्यांचे टोचले कान

Rakhi Sawant Health Update : शनिवारी (१८ मे) राखीवर मुंबईतल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती Ex Husband रितेशने दिली आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या कठीण काळातून जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या छातीत तीव्र वेदना होत असल्यामुळे तिला मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अभिनेत्रीच्या गर्भाशयात गाठ असून ती शस्त्रक्रियेद्वारे काढावी लागणार असल्याचे उघड झाले. काल (शनिवार) राखीवर मोठी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती तिचा Ex Husband रितेशने दिली आहे.

रितेश कुमारची प्रतिक्रिया सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत रितेश म्हणतोय की, "सध्या राखीची तब्येत उत्तम आहे. तिच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया खूप वेळी सुरू होती, तिच्या पोटात असलेला ट्यूमर खूप मोठा होता. शस्त्रक्रिया झाल्यानंतर राखी अजून शुद्धीत आलेली नाही. तिच्यावर तीन तास शस्त्रक्रिया सुरू होती. तिच्यावर अनेक लोकं हसत होते. लोकांमध्ये, आपुलकी राहिलेली नाही. जे दुसऱ्यांच्या वेदनांची खिल्ली उडवतात, त्यांच्यात माणुसकी नाही. त्यानंतर रितेशने ट्यूमरचा फोटो माध्यमांना दाखवला."

रितेश पुढे म्हणतो, "राखी, तू जास्त विचार करू नकोस. मी तुझी काळजी घेईल. पण तरीही काही अज्ञानी लोक सोशल मीडियावर विचित्र विधाने करून राखीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मी सांगतो की, लवकरच तुमची उलटी गिनती सुरू होईल. कारण मारणारा आणि वाचवणाराही देवच आहे. जे दोषी असतील त्यांना लवकरच तुरुंगात पाठवले जाईल." रितेशच्या ह्या व्हिडीओवर चाहत्यांनी राखीला लवकरात लवकर बरा होण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

SCROLL FOR NEXT