Aishwarya Rai Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्याला सिन्नरमधील जमिनीबाबत तहसीलकडून नोटीस, काय आहे प्रकरण?

Aishwarya Rai Bachchan Got Notice: जमिनीचा कर थकविल्या प्रकरणी ऐश्वर्या रायला नोटीस पाठविण्यात आली आहे.

अभिजीत सोनावणे

Sinnar Tehsil News: बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच चर्चेत असते. सध्या ती चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी अनेक रेड कार्पेट इव्हेंटमध्ये सहभागी होत असते. ऐश्वर्याला सध्या लवकरच एका अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. ऐश्वर्याला सिन्नर तहसील कार्यालयाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. कर थकविल्या प्रकरणी ऐश्वर्याला ही नोटीस पाठविण्यात आली.

ऐश्वर्या रायने नाशिकच्या सिन्नरमधील जमिनीचा २२ हजार रुपये कर थकवला आहे. या प्रकरणी सिन्नर तहसील कार्यालयाकडून ऐश्वर्या राय -बच्चनला नोटीस पाठविण्यात आली आहे.

ऐश्वर्या रायची सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात ठाणगाव जवळील आडवाडीच्या डोंगराळ भागात १ हेक्टर २२ आर जमिन आहे. तिच्या या जमिनीचा वर्षाच्या करापोटी २१ हजार ९७० रुपयांची थकबाकी आहे. येथील पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील सुजलॉन कंपनीत अनेक नेते अभिनेत्यांची गुंतवणूक असल्याची चर्चा आहे.

Notice

थकीत अकृषक कराचा भरणा करण्यासाठी ऐश्वर्या रायसह १२०० थकबाकीदारांना नोटीसा यावेळी सिन्नर तहसील कार्यालयाने बजावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

Ashok Sharaf: सलमान खानने अशोक सराफ यांचा गळाच कापला; ३३ वर्षानंतर मामांनी सांगितला शुटिंगचा थरारक किस्सा

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

SCROLL FOR NEXT