Bollywood Actress Wedding saam tv
मनोरंजन बातम्या

Bollywood Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध अभिनेत्री चढली बोहल्यावर; नवऱ्यासाठी केली खास पोस्ट, पाहा लग्नाचे PHOTOS

Actress Wedding Photo : प्रसिद्ध अभिनेत्री नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. सोहळ्याचे खास फोटो पाहा. अभिनेत्रीने नवऱ्यासाठी भावुक पोस्ट शेअर केली.

Shreya Maskar

बॉलिवूडच्या अभिनेत्रीचा थाटामाटात लग्न सोहळा पार

बॉयफ्रेंडसोबत घेतले सातफेरे

लग्नाचे सुंदर फोटो आले समोर

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. सोशल मीडियावर लग्नाचे सुंदर फोटो शेअर करण्यात आले आहे. 'ये काली काली आँखें' या ड्रामामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आंचल सिंहचा थाटामाटात विवाह सोहळा पार पडला आहे. ५-६ दिवसांपूर्वी अभिनेत्रीने बॉयफ्रेंड मोहित चावलासोबत साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. दोघांनी आता आपल्या संसाराला सुरुवात केली आहे.

अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते, कलाकार मंडळी शुभेच्छांचा, प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. आंचल सिंहचा लग्न समारंभ कुटुंबिय, जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये पार पडला. लग्नासाठी अभिनेत्रीने सुंदर लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. त्याला शोभेल असा साज श्रृंगार करून नवरी नटली. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती नवऱ्यासोबत मंडपात आनंदाने विधी करताना, सात फेरे घेताना दिसत आहे.

आंचल सिंहची पोस्ट

आंचल सिंहगने आपल्या नवऱ्यासाठी एक खास पोस्ट शेअर करून प्रेम व्यक्त केले आहे. पोस्टमध्ये तिने लिहिलं की, "प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा खास दिवस येतो, जेव्हा तिचे वडील तिचा हात जोडीदाराच्या हातात देतात. त्या क्षणी माझ्या मनात खूप गोंधळ होता. तेव्हा मला मोहितचे शब्द आठवले, 'तुला पहिल्यांदा पाहिल्यावर माझ्या मनात ही भावना होती की, मी या मुलीशी लग्न करणार आहे. मी शोधत होतो, असा जोडीदार जो घरात आणि जीवनात शांतता आणतो, जेणेकरून एखादी व्यक्ती जगातील लढाया लढू शकेल.

' तर लक्षात ठेवा, लग्न हा आपल्या सर्व लोकांना एकत्र आणण्याचा, मजा करण्याचा आणि आपला आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. जीवनात असे काही क्षण असतात जिथे सर्व गोष्टींशिवाय, जगात खूप काही घडत असताना एकमेकांवर विश्वास ठेवण्याची गरज असते. ती व्यक्ती जी तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त विश्वास ठेवते. होय ते आपल्यासाठी प्रेम आहे आणि आम्ही कृतज्ञ आहोत की आम्हाला ते एकमेकांमध्ये सापडले. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम..."

आंचल सिंह करिअर

आंचल सिंह ही ओटीटीचा लोकप्रिय चेहरा आहे. तिची 'ये काली काली आँखे' ही वेब सीरिज खूप गाजली. आंचल सिंगने २०१३ साली आंचलने श्री सिद्धार्थ गौतमा या चित्रपटातून इंडस्ट्रीत प्रवेश केला. चाहते आता आंचल सिंगच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tanajirao Sawant : मत्री तानाजी सावंतांना मातृशोक! १०५ व्या वर्षी आईचे निधन; राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त

Cucumber seeds: काकडीच्या बिया आरोग्यासाठी खजिना; बियांच्या पावडरचं सेवन केल्यास मिळतील 5 आश्चर्यकारक फायदे

18 of Walking Daily : रोज चालण्याचे तब्बल १८ जबरदस्त फायदे; हा एक सोपा व्यायाम बदलेल तुमचं आयुष्य

Pranayama Benefits: कामाचा स्ट्रेस वाढलाय? मग सकाळी सुरुवात करा प्राणायाम करुन, मिळतील हे ७ फायदे

Maharashtra News Live Update: एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा

SCROLL FOR NEXT