Vikrant Massey SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vikrant Massey: बॅक टू बॅक हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्यानं फिल्म इंडस्ट्री सोडली? पोस्टमुळे खळबळ, कारण वाचून चाहत्यांना बसला धक्का

Vikrant Massey Announce Retirement: बॉलिवूड अभिनेता विक्रांत मॅसीने अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली आहे. नेमकं या मागचे कारण काय जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारा अभिनेता फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकणार आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून 12th Fail फेम अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) आहे.

अभिनेता विक्रांत मेस्सीने त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. आजवरच्या कारकिर्दीत विक्रांतने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच आपल्या भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. काल (1 डिसेंबर) ला विक्रांत मॅसीने इंडस्ट्री सोडण्याची घोषणा केली. तेव्हापासून सोशल मीडियावर चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण प्रेक्षकांना त्याचे चित्रपट पाहायला प्रचंड आवडतात. त्यामुळे हा प्रेक्षकांसाठी हा मोठा आश्चर्याचा धक्का आहे.

विक्रांतने सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी चाहत्यांना दिली आहे. तसेच तिने चाहत्यांचे आभारही मानले आहे. विक्रांतने पोस्टमध्ये लिहिलं की, "नमस्कार, माझी गेली काही वर्षे खूप छान होती. तुमच्या अखंड आणि भक्कम पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. पण आता माझी घरी परत जाण्याची वेळ आली आहे. पती, वडील, मुलगा आणि अभिनेता म्हणूनही. त्यामुळे 2025 मध्ये आपण एकमेकांना शेवटचे भेटणार आहोत. शेवटचे २ चित्रपट आणि अनेक आठवणी. पुन्हा धन्यवाद, सर्व गोष्टींसाठी खूप कृतज्ञ." विक्रांतच्या या पोस्टवर अनेक चाहते आणि कलाकार कमेंट्स करत आहे. चाहत्यांनी कमेंट्स करून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

विक्रांतला 12वी फेल या चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली. त्याचा हा चित्रपट खूप गाजला. यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट केले. नुकताच विक्रांतच्या 'साबरमती रिपोर्ट' ला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT