Bollywood Actor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bollywood Actor : बॉलिवूड अभिनेत्याचा भयंकर स्टंट! १५ मिनिटं श्वास रोखून धरला; लाइव्ह इव्हेंटमध्ये उपस्थितांची उडाली झोप | VIDEO

Bollywood Actor Viral Video : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तो १५ मिनिटं श्वास रोखून उभा असलेला पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्याचा भयंकर स्टंट व्हायरल

अभिनेता १५ मिनिटं श्वास रोखून उभा

लाइव्ह इव्हेंटमधील स्टंट पाहून प्रेक्षक हादरले

सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 'दृश्यम ३'ने अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. आता 'दृश्यम ३'ला टक्कर देण्यासाठी अभिनेता विद्युत जामवालचा 'स्ट्रीट फायटर' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा थाटामाटात पार पडला, ज्यातील विद्युत जामवालचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून प्रेक्षकांचे भान हरपले.

बॉलिवूडचा ॲक्शन स्टार विद्युत जामवाल त्याच्या स्टंट्स आणि फिटनेससाठी ओळखला जातो, पण यावेळी त्याने असे काही केले की प्रेक्षक काही काळासाठी थक्क झाले. विद्युत जामवाल 'स्ट्रीट फायटर' चित्रपटातून हॉलिवूड पदार्पण करत आहे. या ट्रेलर लाँच कार्यक्रमात विद्युत सुमारे १५ मिनिटे डोळे उघडे ठेवून निश्चल उभा होता आणि त्याने आपला श्वास रोखून धरला होता. २० मिनिटं पापणीही लववली नाही. सुरुवातीला प्रेक्षकांना वाटले की, तो कोणत्यातरी प्रकारचे ध्यान करत आहे, पण जसजसा वेळ गेला तसतसे सर्वांचे लक्ष त्याच्यावर केंद्रित झाले.

सुमारे १५ मिनिटांनंतर, त्याच्या पायांमध्ये हलका कंप दिसू लागला आणि त्याच्या डोळ्यात पाणी येऊ लागले. तेव्हाच उपस्थितांच्या लक्षात आले की विद्युतने इतका वेळ आपला श्वास रोखून धरला होता. हे दृश्य पाहून चाहते आणि मीडिया आश्चर्यचकित झाले. विद्युतचा योग आणि मार्शल आर्ट्सशी दीर्घकाळ संबंध आहे आणि त्याची फिटनेस त्याच्या ॲक्शन सीक्वेन्समध्ये स्पष्टपणे दिसून येते. यामुळेच त्याला 'स्ट्रीट फायटर' या हॉलिवूड चित्रपटात धल्सिमची भूमिका मिळाली.

विद्युत जामवालने सांगितल्याप्रमाणे, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याला 50 सेंट, WWE कुस्तीपटू आणि इतर अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. विद्युतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहते त्यावर भरभरून कमेंट्स करून अभिनेत्याचे कौतुक करत आहेत.

'स्ट्रीट फायटर' रिलीज डेट काय?

विद्युत जामवालचा 'स्ट्रीट फायटर' चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नोहा सेंटिनिओ, अँड्र्यू कोजी, कॅलिना लियांग, WWE स्टार रोमन रेन्स उर्फ ​​जो अनोई, डेव्हिड डस्टमाल्चियन, कोडी रोड्स, एरिक आंद्रे, अँड्र्यू शुल्झ, ५० सेंट आणि जेसन मोमोआ यांसारखे मोठे कलाकार दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचारी अन् पेन्शनधारकांची लॉटरी! महागाई भत्त्यात मोठी वाढ; पाहा किती वाढणार पगार?

Maharashtra News Live Update: हिंगोलीत फटाक्याच्या आगीत नगर परिषदेचे तीन कर्मचारी गंभीररित्या जखमी

Moving car safety: धावत्या गाडीत सीट बदलणं का धोकादायक? जाणून घ्या

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! परदेशातील डिग्री, पण भारतात बनावट नोंदणी; बुलढाण्यातील २ नामांकित डॉक्टरांना बेड्या

Pitru Paksha : पितृपक्षात आवर्जून बनवा भोपळ्याची भाजी, कांदा-लसूणशिवायही लागेल एकदम चविष्ट

SCROLL FOR NEXT