Varun Dhawan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Varun Dhawan: 'VD 18'च्या शूटिंगदरम्यान पुन्हा जखमी झाला वरुण धवन, व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत

Varun Dhawan Injured: नुकताच वरुण धवनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते चिंतेत आले आहेत. यामागचे कारण म्हणजे या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुण धवन जखमी झाला आहे.

Priya More

Varun Dhawan VD 18 Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) त्याचा आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. वरुण धवन 'VD 18' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'जवान'चा दिग्दर्शक ऍटली कुमार करत आहे. चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असला तरी देखील वरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. तो आपल्या नवनवीन प्रोजेक्टसोबतच त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

नुकताच वरुण धवनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते चिंतेत आले आहेत. यामागचे कारण म्हणजे या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुण धवन जखमी झाला आहे. त्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत आले आहेत.

अभिनेता वरुण धवन 'VD 18' चित्रपटाच्या सेटवर पुन्हा एकदा जखमी झाला आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. वरुण धवनने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की वरुण धवनच्या पायाला दुखापत झाली आहे. वरुणने आपल्या पायाला पांढऱ्या रंगाची पट्टी बांधली आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने त्यावर लिहिले की, 'पुन्हा एकदा व्हिडी १८ च्या शूटिंगमध्ये...' वरुण धवनला जखमी झाल्याचे पाहून त्याचे चाहते चिंतेत आले आहेत.

अभिनेता वरुण धवन 'VD 18' चित्रपटाच्या सेटवर पुन्हा एकदा जखमी झाला आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. वरुण धवनने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की वरुण धवनच्या पायाला दुखापत झाली आहे. वरुणने आपल्या पायाला पांढऱ्या रंगाची पट्टी बांधली आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने त्यावर लिहिले की, 'पुन्हा एकदा व्हिडी १८ च्या शूटिंगमध्ये...' वरुण धवनला जखमी झाल्याचे पाहून त्याचे चाहते चिंतेत आले आहेत.

'VD 18' च्या शूटिंगदरम्यान वरुण धवन जखमी होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी शूटिंग सुरू झाल्याच्या एका दिवसातच तो जखमी झाला होता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये अभिनेत्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यावेळी तो आईस वॉटर थेरपी घेताना दिसला होता. वरुणला जखमी पाहून त्याचे चाहते चिंतेत आले असून ते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

वरुण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, वरुण शेवटचा 'बवाल' चित्रपटामध्ये दिसला होता. या चित्रपटात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसली होती. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी दोन्ही कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले. त्याचबरोबर तो लवकरच 'रणभूमी' आणि 'इक्कीस' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय वरुण सिटाडेलच्या हिंदी व्हर्जनमध्ये सामंथा रुथ प्रभूसोबत दिसणार आहे. अभिनेत्याकडे 'भेडिया 2'सह अनेक नवीन प्रोजेक्ट देखील हातामध्ये आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT