बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा 'बेबी जॉन' (Baby John) बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यास कमी पडत आहे. हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली. मात्र त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत घसरण होताना पाहायला मिळाली. आता हा चित्रपट चाहत्यांना घर बसून पाहायचा आहे.
'बेबी जॉन' हा ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटातील वरुणची (varun Dhawan ) ॲक्शन चाहत्यांना खूप आवडली आहे. 'बेबी जॉन' या चित्रपटाचे ॲटली कुमार दिग्दर्शक आहे. या चित्रपटातील गाणी चाहत्यांना खूप आवडली. या चित्रपटाद्वारे साऊथ अभिनेत्री कीर्ती सुरेश बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात वामिका गब्बी आणि वरुण धवन मुख्य भूमिकेत आहे.
'बेबी जॉन' हा वरुण धवनचा ॲक्शन ड्रामा चित्रपट मीडिया रिपोर्टनुसार, ॲमेझॉन प्राइमवर पाहता येणार आहे. या चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स ॲमेझॉन प्राइमने खरेदी केले आहेत. हा चित्रपट थिएटरमध्ये 25 डिसेंबरला रिलीज झाला असून मीडिया रिपोर्टनुसार, दोन महिन्यात तो ओटीटीवर (OTT Release) प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मात्र अजूनही ओटीटी रिलीज डेट अधिकृतरित्या जाहीर झाली नाही.
'बेबी जॉन' चित्रपट साऊथ सुपरस्टार थलपथी विजयच्या थेरीचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती. 'बेबी जॉन' चित्रपटात वरुण धवन सोबतच कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ, राजपाल यादव आणि सान्या मल्होत्रा पाहायला मिळत आहेत. चाहते 'बेबी जॉन'च्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.