अभिनेता सनी देओल नुकताच ‘गदर २’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तब्बल २१ वर्षांनंतर ‘गदर: एक प्रेमकहाणी’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘गदर’च्या दोन्हीही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड केली होती. नुकतंच अभिनेता सनी देओलने गोव्यातल्या इफ्फी फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. यावेळी त्याने आपल्या एकंदरितच बॉलिवूड प्रवासावर भाष्य केलं. आपल्या सिनेकारकिर्दितील यशाबद्दल बोलताना त्याच्या डोळ्यातही पाणी आले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
‘मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो. माझ्या फिल्मी करियरची सुरुवात राहुल रवैल यांच्या चित्रपटातून केली होती. माझे अनेक चित्रपट चालले तर, काही चित्रपट फ्लॉप ठरले. पण जरीही असे असले तरी, अजूनही माझे चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेले तीन चित्रपट माझ्यासाठी खूप खास ठरले. आणि त्याच चित्रपटांमुळे मी आज इथे उभा आहे.’
‘२००१ मध्ये ‘गदर’ रिलीज झाला होता. ‘गदर’ला मिळालेल्या यशानंतर मला खूप संघर्ष करावा लागला होता. ‘गदर’नंतर मला एकही चांगला चित्रपट किंवा स्क्रिप्ट मिळत नव्हती. अपेक्षेसारख्या ऑफर मिळत नसल्यामुळे मी त्या नाकारत होतो. मी त्यानंतर काही चित्रपट सुद्धा केले पण त्यामध्ये खूप वर्षांचे अंतर होते. मी फिल्म इंडस्ट्रिमध्ये स्टार होण्यासाठी नाही तर कलाकार होण्यासाठी आलो होतो.’ (Bollywood)
सनीचे हे सर्व ऐकून दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना मोठा धक्काच बसला. सनीचे हे स्ट्रगल ऐकून दिग्दर्शक राजकुमार संतोषी ढसाढसा रडले. ‘बॉलिवूडने सनी देओलच्या अभिनयाला कधीच न्याय दिला नाही.’ अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक राजकुमार संतोषीने दिली. सनी देओलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.