sonu sood  twitter/@SonuSood
मनोरंजन बातम्या

Sonu Sood: मला माफ करा! सरत्या वर्षाला निरोप देताना सोनू सूदने का मागितली माफी? व्हायरल ट्विटची सोशल मीडियावर चर्चा

सध्या सोनू सूदचे सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या शुभेच्छा देणारे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bollywood News: कोरोना काळात झालेल्या लॉकडाऊनमुळे सामान्य जनतेचे मोठे हाल झालेले देशभरात पाहायला मिळाले. मुंबईत अडकलेल्या चाकरमान्यांना या काळात पायपीट करत त्यांच्या राज्यात जावे लागले. मात्र या काळात बॉलिवूड अभिनेता सोनु सूद त्यांच्या मदतीला धावून आला अन असंख्य लोकांचा तो देवदूत झाला. तेव्हापासून आजपर्यंत अभिनेता सोनु सूद त्याच्या मदतीमुळे नेहमीच चर्चेत असतो.

मात्र सध्या सोशल मीडियावर सोनू सूदच्या (Sonu Sood) मदतीची नव्हेतर त्याच्या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे. काय आहे सोनु सूदची ती चर्चित पोस्ट चला जाणून घेवू.

याबाबत अधिक माहिती अशी की, बॉलिवूड अभिनेता सोनु सूद सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. आपल्या दमदार अभिनयाने आणि आव्हानात्मक भूमिकांनी सोनू सूदने सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचसोबत तो त्याच्या दिलदारपणासाठीही ओळखला जातो. सध्या सरत्या वर्षाला निरोपआणि नववर्षाच्या शुभेच्छा देणारे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हायरल ट्विटमध्ये सोनू सूदने “मागच्या वर्षी 10117 लोकांना वाचवण्यात आणि निरोगी ठेवण्यात समर्थ ठरलो. ज्या लोकांपर्यत पोहचू शकलो नाही अशा लोकांची माफी मागतो. 2023 सर्वोत्तम राहण्यासाठी देव आपल्याला आणखीन शक्ती देवो, 2023 वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा,” अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेता सोनू सूदच्या या व्हायरल ट्विटवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे., ज्यामध्ये अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे तर काही जणांनी सोनू सूदलाही नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान सोनू सूद यावर्षी सम्राट पृथ्वीराज चित्रपटात झळकला होता. ज्यामधील त्याच्या भूमिकेचे जोरदार कौतुक झाले होते. (Bollywood)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agriculture Crisis: राजकारणानं घेतला शेतकऱ्याचा बळी? तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या

IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

Maharashtra Live News Update: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या

Fact Check: बाजारात ५५० रूपयांचं कॉईन? १०० आणि ७५ रुपयांचंही कॉईन येणार?

Accident: मुंबईत अपघाताचा थरार! हायवेवर रेस लावणं पडलं महागात, महागड्या पोर्शे कारचा चुराडा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT