Siddhaanth Vir Surryavanshi/Social Media SAAM TV
मनोरंजन बातम्या

Siddhant Vir Suryavanshi : सिद्धांतचं वैवाहिक आयुष्यही होतं चर्चेत, 15 वर्षांचा संसार मोडून केलं होतं दुसरं लग्न

सिद्धांतच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, सिद्धार्थने एकदा नाही तर दोनदा लग्न केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Siddhant Vir Suryavanshi : टीव्ही इंडस्ट्रीतील आणखी एका कलाकाराला जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता सिद्धांत वीर सुर्यवंशी याचे काल निधन झाले. त्याने वयाच्या ४६व्या वर्षी जगाचा अखेरचा निरोप घेतला.

जीममध्ये वर्कआउट करत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्या ट्रेनरने रुग्णालयात तातडीने नेले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. त्याच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या चाहत्यांनी, सहकारी कलाकारांनी, नातेवाईक आणि मित्रमंडळींनी शोक व्यक्त केला आहे.

सिद्धांत टीव्हीवरील एक प्रसिद्ध चेहेऱ्यांपैकी एक आहे. त्याने आपल्या करियरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. सिद्धार्थ गेल्या २१ वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात होता. एकता कपूरच्या 'कुसुम' या मालिकेतून पदार्पण केल्यानंतर तो कसौटी जिंदगी की, सुर्यपुत्र करण आणि अशा अनेक टीव्ही शोमध्ये त्याने काम केले होते. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, सिद्धार्थने एकदा नाही तर दोनदा लग्न केले.

पहिली पत्नी इरा सुर्यवंशीसोबत १५ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर त्या जोडीने २०१५ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर सिद्धांतने रशियन वंशाची मॉडेल आणि अभिनेत्री अलेसिया राऊतसोबत २०१७मध्ये संसार थाटला होता. अलेसिया हे मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव. ती खतरों के खिलाडीच्या ४ सीझनमध्येही दिसली होती.

अलेसिया मेरी बेरी के बेर, एक आंख मारो सारख्या अनेक लोकप्रिय आयटम सॉंगमध्ये थिरकली होती. या गाण्यांच्या माध्यमातून अलेसियाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते. त्याच्या पहिल्या पत्नीप्रमाणे दुसऱ्या पत्नीसोबतही घटस्फोट घेतला. तिला पहिल्या लग्नानंतर एक मुलगी असून सिद्धांत आणि अलेसियाला एक छोटा मुलगा देखील होता. एक मुलगीही आहे. तर त्या दोघांना एक छोटा मुलगाही होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT