Shahrukh Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan : हातावर टॅटू अन् काळा गॉगल; 'किंग'चा पहिला लूक व्हायरल, पाहा VIDEO

Shahrukh Khan New Look : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान नवीन हटके लूकमध्ये दिसत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडचा किंग खान (Shahrukh Khan ) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट आहे. त्याच्या अभिनयाचे आणि लूकचे चाहते दिवाने आहेत. त्याची स्टाइल कायम हटके राहिली आहे. त्याचा कान्स लूक देखील खूप व्हायरल झाला. सध्या त्याच्या नवीन लूकचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

शाहरुख खानच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये त्याचा खास लूक दिसत आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख खानने डोळ्यांवर गॉगल लावलेला आणि हातावर टॅटू काढलेला दिसत आहे. त्याचा हा स्टायलिश लूक पाहून चाहते दिवाने झाले आहेत. शाहरुख खानच्या हातावरील टॅटू त्याच्या 'किंग' चित्रपटातील पात्रासाठी आहे. 'किंग'मध्ये शाहरुख खान गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख खान व्हाइट रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे.

शाहरुख खानच्या या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. नेटकरी त्याच्या लूकचे आणि हातावरच्या टॅटूचे कौतुक करत आहेत. त्याच्या टॅटूवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. शाहरुख खानचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. शाहरुख खानच्या नवीन लूकची झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल लूकमध्ये शाहरुख खान डोळ्यांवर काळा गॉगल, डोक्यावर बिनी कॅप, हातावर आकर्षक टॅटू अशा हटके लूकमध्ये दिसत आहे.

'किंग' चित्रपट

सध्या शाहरुख खान आगामी चित्रपट 'किंग' च्या (King ) शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. 'किंग' हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात सुहाना खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, अभय वर्मा, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि अर्शद वारसी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. 'किंग' हा सिध्दार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपट आहे. ज्यात शाहरुख खान मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'लव्ह अँड वॉर'च्या सेटवर भयंकर अपघात; कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, संजय लीला भन्साळी नुकसान भरपाई करणार

Rain Alert : मुंबईत अखेर मान्सूनचे दमदार आगमन, पुढील काही तास महत्त्वाचे; वाचा हवामानाचा अंदाज

जिमला न जाता मेथी, ओवा आणि बडीशेपचं पाणी प्या, पोटावरची चरबी मेणासारखी वितळेल

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! ओमराजेंसह ६ बंडखोर खासदार आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT