Shahid Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Shahid Kapoor'नं दिलं वरळीचं घर भाड्याने, किंमत ऐकून डोळे भिरभिरतील

Shahid Kapoor Worli House : बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरनं आपलं वरळीतील आलिशान घर भाड्याने दिलं आहे. किती रुपयांमध्ये डील झालं जाणून घ्या.

Shreya Maskar

दिवाळीच्या मुहूर्तावर जेथे कलाकार नवीन घर विकत घेत आहेत तिथे बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने (Shahid Kapoor) आपलं घर भाड्याने दिलं आहे. शाहिद कपूर आणि पत्नी मीरा कपूरने आपलं वरळीमधील आलिशान घर भाड्याने दिलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, शाहिद कपूरने आपला वरळीतील फ्लॅट पाच वर्षांसाठी भाड्याने दिला आहे. या फ्लॅटचं शाहिद कपूरला महिन्याला 20 लाख भाडे मिळणार आहे. शाहिदचे वरळीतील घर ओबेरॉय रियल्टीच्या थ्री सिक्स्टी वेस्ट नावाच्या बिल्डिंगमध्ये आहे. शाहिद कपूरचे घर खूप मोठे आहे. 5,395 चौरस फूट आहे. तसेच या घराला तीन कार पार्किंग देखील आहेत.

शाहिद आणि मीरा कपूरने 7 नोव्हेंबर रोजी पाच वर्षांसाठी घराचा करार केला आहे. त्यांनी आपला फ्लॅट डी'डेकोर होम फॅब्रिक्सचे (D' Decor Home Fabrics) वरिष्ठ अधिकारी दीपन भूपतानी यांना भाड्याने देण्यात आलं आहे. हा करार 60 महिने म्हणजे 5 वर्षांसाठी केला आहे. यासाठी अधिकारी दीपन भूपतानी यांनी 1 कोटी 23 लाखांचे डिपॉझिट शाहिद कपूरला दिले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सुरुवातीच्या महिन्याचे भाडे 20.5 लाख असेल. नंतर पाच वर्षापर्यंत 23.98 लाख रुपये भाडे असेल.अजून शाहिद कपूरने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही आहे. शाहिद आणि मीराने हे घर मे 2024 मध्ये60 कोटींना खरेदी केले होते.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. त्याने अनेक हिट चित्रपट केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT