बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) 'देवा' (Deva) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'देवा' चित्रपट ॲक्शन-थ्रिलर आहे. 'देवा' चित्रपट 31 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला रिलीज होऊन फक्त दोन दिवस झाले आहे. दोन दिवसात चित्रपटाने चांगली कमाई केली, असे म्हणायला हरकत नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपट पहिल्या दिवशी 5 कोटी 50 लाखांचा व्यवसाय केला. तर चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी जवळपास 6 कोटी 25 लाख रुपये कमावले आहेत. आतापर्यंत 'देवा' चित्रपटाने जवळपास 11 कोटी 75 लाखांचा व्यवसाय केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास 1.67 कोटी रूपयांची कमाई केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'देवा' चित्रपटाने जगभरात 10.10 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. 'देवा' चित्रपट रोशन अँड्र्यूज दिग्दर्शित आहे. 'देवा' चित्रपटच्या संध्याकाळच्या शोला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाला चेन्नई, हैदराबाद, मुंबई या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाहिद कपूरच्या दमदार भूमिका चाहत्यांना खूप आवडली आहे. 'देवा' चित्रपटात शाहिद कपूरचा हटके स्वॅग दाखवण्यात आला आहे. शाहिद कपूरचा देवा' चित्रपट 85 कोटी बजेटमध्ये बनला आहे.
चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरने चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.'देवा' चित्रपटात शाहिद कपूर पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर पूजा हेगडे पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट भविष्यात किती कोटींचा व्यवसाय करतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.