Shah Rukh Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan: काल एअरपोर्टवर शाहरुख सोबत नक्की काय घडलं? वाचा सविस्तर...

शनिवारी सकाळी दुबईतील शारजाह येथे एका बुक लॉंचिंग सोहळ्यावरुन मुंबईत आल्यावर शाहरुखला आणि त्याच्या टीमला रात्री उशिरा सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर रोखले, याविषयी एक सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shahrukh Khan: शाहरुख खान, त्याची मॅनेजर पूजा ददलानी आणि शाहरुखचा अंगरक्षक रवी सिंग शनिवारी सकाळी दुबईतील शारजाह येथे एका बुक लॉंचिंग सोहळ्यावरुन मुंबईत आल्यावर शाहरुखला आणि त्याच्या टीमला रात्री उशिरा सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर रोखले होते. याविषयी एक सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचे लाखो रुपयांचे घड्याळ भारतात आणणे, बॅगेत महागड्या घड्याळांचे रिकामे बॉक्स सापडणे सोबतच कस्टम ड्युटी न भरल्याबद्दल शाहरुख आणि त्याच्या टीमची चौकशी करण्यात आली.

सीमाशुल्क विभागाने या घड्याळांचे मूल्यांकन करत त्यांना कस्टम ड्यु़टी भरण्यास सांगितले होते. शाहरुखच्या टीमकडे सुमारे 18 लाख रुपयांची महागडी घड्याळे होती, जी त्यांनी दुबईमधून खरेदी केली होती.

आता, सीमाशुल्क विभागातील वरिष्ठ अधिका-याने खुलासा केला आहे की, शाहरुखला आणि त्याच्या टीमला दंड ठोठवण्यात आला नाही. केवळ मूलभूत औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वेबसाईटला सांगितले की, 'शाहरुख खान आणि त्याच्या टीमला त्यांच्यासोबत आणल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी ड्युटी भरण्यास सांगण्यात आले होते. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कोणताही दंड भरण्यास सांगितलेला नाही. या प्रकरणी सोशल मीडियावर जे काही बोलले जात आहे ते सर्व खोटे आहे.

शाहरुखचा विश्वासू अंगरक्षक रवी सिंग याला खाजगी GA टर्मिनलवरून T2 टर्मिनलवर का नेण्यात आले याचे स्पष्टीकरण देताना अधिकारी म्हणाले, जेव्हा ड्युटी किंवा इतर कोणतेही शुल्क भरण्याचे प्रकरण असते तेव्हा प्रवाशांना GA टर्मिनलवरून T2 वर नेले जाते.

अधिकाऱ्याने पुढे असेही स्पष्ट केले की, शाहरुखची टीम फक्त ऍपल वॉच आणि वॉच वाइंडर केस (आलिशान घड्याळांसाठी वापरल्या जाणारी एक विशेष बॅग) घेऊन जात होते. सुरुवातीला महागडी घड्याळे नसल्याचे नोंदवले गेले होते. शाहरुखला शारजाहमध्ये मिळालेल्या भेटवस्तूंची किंमत अंदाजे 17.86 लाख रुपये इतकी होती.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT