Shahrukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan: अखेर शाहरुखने मौन सोडले, चित्रपटात का नाही दिसला? सांगितले 'हे' कारण

बॉलिवूड अभिनेता किंगखान म्हणून नावारुपास असलेला शाहरुख खान गेल्या चार वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होता. नुकताच त्याने त्यामागील खरे कारण स्पष्ट केले आहे.

Chetan Bodke

Shahrukh Khan: बॉलिवूड अभिनेता किंगखान म्हणून नावारुपास असलेला शाहरुख खान गेल्या चार वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होता. दरवर्षी चाहत्यांसाठी एक- दोन चित्रपटातून का होईना चाहत्यांसमोर यायचा. परंतू गेल्या चार वर्षांपासून शाहरुख मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसला नाही. परंतू सध्या काही चित्रपटात त्याने साईड रोलचे काम केले होते.

अशा परिस्थितीत चाहते त्याच्या पुनरागमनाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. पुढच्या वर्षी म्हणडेच येत्या २०२३ या वर्षात किंग खान तीन चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या सगळ्यात शाहरुख खान मोठ्या पडद्यापासून दूर का राहिला हा प्रश्न नक्कीच सर्वांना पडला असणार.

याच पार्श्वभूमीवर शाहरुखने इतके दिवस मोठ्या पडद्यापासून दुर राहिल्याचे अखेर कारण स्पष्ट केले आहे.सौदी अरेबियातील जेद्दाह येथे पार पडलेल्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलदरम्यान शाहरुखने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

चित्रपट महोत्सवादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुखने सांगितले की, मुलगी सुहानामुळे तो आपल्या चाहत्यांना मुख्य भूमिकेत न दिसल्याचे कारण सांगितले. सुहाना न्यूयॉर्कमध्ये अभ्यासासाठी गेली आहे. अशा स्थितीत आठ महिने तो सुहानाच्या फोनची वाट पाहत होता की ती मला फोन करेल. जेव्हा तिने मला फोन केला, त्यावेळी मी तिला विचारले की मी आता तरी काम करू शकतो का?

यावर सुहाना म्हणाली, तू काम का करत नाहीस? मी म्हणालो, मला वाटले की जर तुला न्यूयॉर्कमध्ये एकटे वाटत असेल तर तु मला कॉल करशील.' शाहरुख खानला अशी भावना होती की जर सुहानाला एकटे वाटत असेल तर तो तिच्यासोबत राहण्यासाठी न्यूयॉर्कला जाईल आणि म्हणूनच त्याने कोणत्याही नवीन चित्रपटाला होकार दर्शवला नव्हता.

त्याचवेळी शाहरुख खानने आणखी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला आता पुढील 10 वर्ष अॅक्शन चित्रपट करायचे आहेत. त्याला मिशन इम्पॉसिबल सारख्या टॉप अॅक्शन चित्रपटात काम करायचे आहे. यामुळेच शाहरुख खान चार वर्षांच्या ब्रेकनंतर जवान आणि पठाण यांसारख्या चित्रपटातून पुनरागमन करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT