Shah Rukh Khan's statement on the Pathaan controversy Instagram @iamsrk
मनोरंजन बातम्या

Pathaan: 'पठान'च्या वादात शाहरुखचा जुना व्हिडीओ व्हायरल म्हणतो, 'इतका ही कमकुवत नाही...'

दरम्यान, शाहरुख खानचा सध्या एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बॉयकॉट ट्रेंडच्या नादात उडुन जाण्याइतका मी कमकुवत नाही असे तो म्हटला आहे.

Chetan Bodke

Pathaan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख गेले काही वर्ष मोठ्या पडद्यापासून दुर होता. २०२३ मध्ये शाहरुख पुन्हा एकदा मोठ्या जोशात पदार्पण करत आहे. सध्या सर्वात जास्त शाहरुख- दीपिका यांच्यावर नेटकरी ट्रोलधाड टाकण्याचा प्रयत्न करत आहे. चित्रपटातील पहिल्या गाण्यामुळे इतका वादंग पेटला असून ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला नेटकरी किती ट्रोल करणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. शाहरुखच्या पठान मधील 'बेशरम रंग' गाण्यातील भगव्या रंगाच्या बिकनीमुळे ट्रोलिंग होत आहे.

गाण्यात फक्त भगव्या रंगाची बिकनी घातल्यामुळे अनेक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. इंदौरमध्ये शाहरुख- दीपिकाचे पुतळे उभे करत चित्रपटाविरोधात काही संघटनांनी विरोध दर्शवला आहे. मध्य प्रदेशात हिंदू सेनेने ‘पठान’ चित्रपट राज्यातच काय तर देशात प्रदर्शित होऊन देणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. दरम्यान, शाहरुख खानचा सध्या एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बॉयकॉट ट्रेंडच्या नादात उडुन जाण्याइतका मी कमकुवत नाही असे तो म्हटला आहे.

शाहरुख खानचा हा व्हिडिओ बराच जुना असून कोमल नहाटा यांच्या शोमधील त्याचे विधान आहे. जेव्हा शाहरुख शोमध्ये आला होता त्यावेळी त्याला विचारण्यात आले की, सामाजिक बहिष्कारामुळे तुझे नुकसान होईल असे तुला वाटते का?

यावर शाहरुखने म्हणतो, 'मी कोणत्याही ट्रेंडने ढासळणारा व्यक्ती नाही. ज्यांनी मला बॉयकॉट केले, ते खूपच आनंदीत असतील. पण या भारतात माझ्या एवढे प्रेम कोणालाच मिळाले नसेल. हे प्रेम कोणत्याही गोष्टीमुळे कमी न होणारे आहे. याचा माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर परिणाम झाला आहे असे मला वाटत नाही.

शाहरुख अलिकडेच कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'पठान'च्या गदारोळावर म्हणाला होता की, जग काहीही करू शकते, परंतु जोपर्यंत सकारात्मक लोक जिवंत आहेत तोपर्यंत कोणीही काहीही करू शकत नाही. शाहरुख म्हणतो, 'जग काहीही करू शकते हे सांगताना मला याचा अजिबात आक्षेप नाही... मी आणि तुम्ही आणि सगळे सकारात्मक लोक जिवंत आहोत."

'बेशरम रंग' गाण्यातील दीपिका पदुकोणच्या ड्रेसने सर्वत्र चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी भगव्या रंगाला बदनाम करण्याचा कट रचल्याचा आरोप केला जात आहे. हिंदू सेनेनेही सेन्सॉर बोर्डावर प्रश्न उपस्थित केले आहे.

'पठान' चित्रपट येत्या 25 जानेवारी 2023 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, आशुतोष राणा, डिंपल कपाडिया, गौतम रोडे आणि शाजी चौधरी यांच्याही भूमिका आहेत. यात सलमान खान आणि हृतिक रोशनची अॅक्शन प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan-Gauri Spratt : गौरीसोबत माझं आधीच लग्न झालंय; आमिर खाननं सांगितली तिसऱ्या लग्नाची माहीत नसलेली गोष्ट

Maharashtra Live News Update : आंदोलकांना आदल्या दिवशी अटक का केली? आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका

Pune Crime : कोंढवा अत्याचार प्रकरणात आणखी मोठा ट्विस्ट, तरुणीला 'या' महिलेनं केलं होतं मार्गदर्शन

Matheran Accident: माथेरान घाटातून उतरताना ब्रेक फेल झाल्यानं कार उलटली; ६ पर्यटक अडकले अन्...

Pune Tourism : पाऊस अन् घनदाट जंगल, पुण्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट लोकेशन

SCROLL FOR NEXT