Pathan Teaser  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathaan Teaser: अॅक्शनचा तडका असलेला 'पठाण'चा टीझर आला रे; किंग खान म्हणतो, 'तुमच्या खुर्चीचा पट्टा बांधा...'

यशराज फिल्म्सने शाहरुखच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त 'पठाण' चित्रपटाचा टीझर रिलीज करून किंग खानच्या चाहत्यांना एक जबरदस्त भेट दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pathaan Teaser Out: जशी चर्चा झाली तसेच घडले. शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त त्याचा आगामी 'पठाण' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. यशराज फिल्म्सने शाहरुखच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त पठाण चित्रपटाचा टीझर रिलीज करून किंग खानच्या चाहत्यांना एक जबरदस्त भेट दिली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये शाहरुखची दिमाखदार एन्ट्री आणि खास शैली पाहून चाहते 'किंग खान इज बॅक' असं म्हणत आहेत.

टीझरमध्ये शाहरुखच्या तोंडाला रक्त लागल्याचे दिसत आहे. तसेच दीपिकाच्या स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'पठाण' चित्रपटाचा टीझर हिंदी, तमिळ आणि तेलगू या तिन्ही भाषांमध्ये रिलीज झाला आहे. शाहरुख खानचे चाहते आपल्या स्टारला पडद्यावर पाहण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत.

शाहरुख खान 'पठाण' चित्रपटातून पुनरागमन करत चाहत्यांना धडाकेबाज अॅक्शनमध्ये दिसत आहे. त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. तुमच्या खुर्चीचा पट्टा बांधा… पठाणचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन पहायला मिळतेय. शिवाय जॉन अब्राहम आणि शाहरुखची हटके भूमिका पाहून चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण धमाकेदार एन्ट्रीही टीझरमध्ये पहायला मिळतेय. एकंदरीत फूल पॅकेज सिनेमा असल्याचा अंदाज टीझरवरुन लावला जाऊ शकतो. पठाणच्या टीझरमध्ये व्हीएफएक्स आणि अॅक्शनचा जबरदस्त कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मेकर्सच्या 'पठाण'ची भव्य झलक टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आहेत. या चित्रपटात शाहरुख खानशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हे त्रिकूट मोठ्या पडद्यावर कितीचा गल्ला जमवते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. टीझरमुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हा चित्रपट पुढील वर्षात २५ जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. पठान व्यतिरिक्त शाहरुख खान विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्या 'अटली का जवान' मध्ये देखील दिसणार असून तापसी पन्नूसोबत राजकुमार हिरानीचा 'डंकी' सिनेमातही झळकणार आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT